आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षानंतर आई-वडिलांना कळाले मुलीचे असे सत्य, अश्रू झाले अनावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- येथे दीड वर्षांपूर्वी बेपत्ता असलेल्या अल्पवयीन तरूणीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्या मुलीला आतापर्यंत कुटुंबीय आणि पोलिस जिवंत समजत होते, तिचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. तिची हत्या करणारा दुसरा दिसरा कोणी नसून तिचा प्रयकरच आहे. पोलिसांनी सोमवारी याचा खुलासा करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. 


जाणून घ्या संपूर्ण घटना...
- प्रकरण दीड वर्षांपूर्वीचे आहे. 17 वर्षीय यामिनी सोनी आपल्या कुटुंबासोबत राहत होती.
- तिची भेट रायपूर येथील चंगोरभाटा येथील 22 वर्षीय तरूण साहिल विश्वकर्माशी झाली.
- साहिलने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एक दिवस साहिल आपल्या मित्रांसोबत होता आणि त्याने यामिनीला देखील तिथे बोलवून घेतले.
-  तीघे जण धमतीर रोडवर फिरण्यासाठी गेले. येथेच साहिलसोबत कुठल्यातरी कारणावरून यामिनीचा वाद झाला.
- साहिलचा मित्र नानू काही खाण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेला होता. तेवढ्यात रागाच्या भरात साहिलने तरूणीचा गळा दाबून तिची हत्या केली.
- दोघे शव ऑटोमधून घेऊन आले. मित्र घाबरून पळून गेला. रात्री साहिल ऑटो घेऊन घरातून निघत होता.
- त्याच्या मोठ्या भावाने त्याला अडवले. आर्ध्यारात्री जाण्याचे कारण विचारले, तेव्हा साहिलने संपूर्ण घटना सांगितली.
- नंतर साहिल, त्याचा मोठा भाऊ, भावजयी यांनी मिळून अल्पवयीन तरूणीचा मृतदेह धमतरी नदीत फेकून दिला.
- तीन दिवसानंतर धमतरी पोलिसांनी मृतदेह जप्त केला. आस-पासच्या जिल्ह्यात मृत तरूणीचा फोटो जारी केला. 
- महासमुंदच्या एका वृद्धाने मृत आपली बेपत्ता असलेली मुलगी असल्याची ओळख केली आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
- इकडे, दीड महिन्यानंतर वृद्धाची मुलगी आपल्या घरी परतली. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली.
- दोन्ही जिल्ह्यात नवीन एसपी अल्यानंतर या प्रकरणी पुन्हा सखोल तपास करण्यात आला. कॉल डिटेलच्या आधारावर आरोपीला अटक करण्यात आली.
- इधर मृत तरूणीच्या नातेवाईकांना ती परत येईल याची आशा होती.़
- परंतु, दीड वर्षानंतर त्यांना मुलीचा मृत्यू झाल्याचे कळाले, तेव्हा ते ढसा ढसा रडू लागले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...