आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगरमध्ये 32 तास चकमक, दोन अतिरेक्यांना कंठस्नान; आणखी एका जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/ जम्मू- श्रीनगरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर गोळीबार करून एका घरात लपलेले दोन अतिरेकी ३२ तासांच्या चकमकीनंतर मंगळवारी मारले गेले. दरम्यान, सोमवारी रात्री संुजवां कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात आणखी एका जवानाचा मृतदेह सापडला आहे. यामुळे हल्ल्यातील मृतांची संख्या ७ झाली. यात ६ जवानांचा समावेश आहे.


श्रीनगरमधील करन नगर भागात पाच मजली इमारतीमध्ये लपलेल्या अतिरेक्यांकडे दोन एके-४७ रायफली आणि आठ मॅगझिन सापडले. हे दोघेही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे पुरावेही हाती लागले आहेत.


दरम्यान, संुजवां हल्ल्यानंतर चौथ्या दिवशी मंगळवारी पहाटे संतरी पोस्टवर अतिरेक्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर हे अतिरेकी पळून गेले. पोलिसांनुसार, मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अतिरेक्यांनी जम्मू-अखनूर रोडजवळ दोमाना कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मजल मारली. 

बातम्या आणखी आहेत...