आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूच्या जंगलात वणवा, 10 ठार; सीटीसी ट्रेकिंग समूहाने आयोजित केलेल्या ट्रेकर्सचा बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थेनी- तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील कुरंगानी जंगल क्षेत्रात पेटलेल्या वणव्यात आतापर्यंत ९ जणांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. या जंगलात लागलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आग आहे. मृत ९ जण ट्रेकर होते. त्यांचा भाजून मृत्यू झाला. ही नैसर्गिक आपत्ती असल्याच्या वृत्ताला अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला आहे. यामध्ये १७ जण जखमी असून १० जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात यश आले आहे. सुटका केलेल्या २७ जणांपैकी १० जणांना कोणतीही जखम झालेली नाही. गंभीर भाजलेल्या ८ जणांवर मदुराई रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी पल्लवी बलदेव यांनी सांगितले की, मृत ट्रेकर्सपैकी ६ जण चेन्नईचे होते. ३ जण इरोड जिल्ह्यातील होते. बचाव कार्यासाठी वायुदलाचे पथक पाठवण्यात आले आहे. आगीतून ९ मृतदेह या कमांडोंनी काढले असून थेनी सरकारी रुग्णालयात ते पोहोचवले आहेत. 
बचाव पथकाने सोमवारी सकाळपर्यंत २७ जणांना येथून बाहेर काढले. यामध्ये अल्पवयीन मुली, महिलांचा समावेश आहे. १७ जण जखमी आहेत. थेनी सरकारी रुग्णालय व खाजगी रुग्णालयात किरकोळ जखमींवर उपचार सुरू आहेत. 

 

पूर्वपरवानगीविना सुरू होते ट्रेकिंग 
मदुराईचे वन संरक्षक आर. के. जेगानिया यांनी सांगितले की, चेन्नई येथील ट्रेकिंग क्लबने पश्चिम घाटात कुरंगानी ते बोडीपर्यंत ट्रेकची पूर्वपरवानगी घेतली नव्हती. गेल्या शुक्रवारी रात्री २६ महिला, ३ मुले व ८ पुरुष असलेल्या गटाने ट्रेक सुरू केला होता. शनिवारी ते केरळच्या जंगलाजवळ आले. बोडीहून हा चमू चेन्नईला जाणार होता. सोमवारी दुपारी ते वणव्यात घेरले गेले.

 

ऑनलाइन सीटीसी समूहाद्वारे ट्रेकचे आयोजन 
 सीटीसी हा ना नफा तत्त्वावर चालवला जाणारा ट्रेकिंग क्लब आहे. त्याचे संकेतस्थळ असून त्याद्वारे ट्रेकर्स एकत्र येतात. आऊटडोर खेळ, पर्यावरण संरक्षण, सामाजिक कामांसाठी हा समूह काम करतो. ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट चेन्नई ट्रेकर्स डॉट ओआरजी’ संकेतस्थळावर ट्रेकर्सची माहिती व फोन क्रमांक नव्हते. २००८ मध्ये याची स्थापना झाली आहे. दक्षिण भारतातील सर्वाधिक सक्रिय समूहांपैकी हा आहे. याचे ४० हजार सदस्य आहेत. वर्षभर याचे शेकडो उपक्रम होत असतात. सर्व उपक्रम नि:शुल्क असल्याचे संकेतस्थळावर लिहिले आहे. सदस्य खर्चामध्ये आपली समान वर्गणी देतात. ट्रेकिंग विशेषज्ञ आहेत वा नाहीत याची माहिती संकेतस्थळावर दिलेली नाही.  

 

 

सायंकाळी सुरू झाले बचावकार्य 
राज्याचे उपमुख्यमंत्री आे. पन्नीरसेल्वम व त्यांचे सहकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. थेनी येथे एका हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे रसायनमिश्रित द्रव्याची फवारणी सुरू आहे. सायंकाळी घटनेची माहिती मिळताच केंद्र व राज्य सरकारने बचावकार्य सुरू केले. आठवडाभरापासून येथे वणव्याच्या घटना घडल्या होत्या. सोमवारच्या वणव्याची तीव्रता अधिक होती.  

 

ग्रुपमध्ये 25 महिला, तीन मुले आणि 8 पुरुष 
- थेनीचे जिल्हाधिकारी पल्लवी बलदेव म्हणाल्या, '36 जणांच्या ग्रुपमध्ये कोइंबतूर आणि इरोड जिल्ह्यातील 12 विद्यार्थी होते. 24 जण हे चेन्नई येथील ट्रेकिंग टीमचे होते. यातील 25 महिला, तीन मुलं आणि 8 पुरुष होते. हे सर्व शनिवारी सकाळी कुरंगनी येथील जंगलात ट्रेकिंगसाठी गेले होते. रविवारी सकाळी जंगलात वणवा पेटला आणि हे सर्वजण आगीत अडकले. रविवारी दुपारी 3 वाजता फायर ब्रिगेडला सूचना मिळाल्यानंतर मदत कार्यास सुरुवात झाली.'

 

अडकलेल्या विद्यार्थ्याने वडिलांना दिली होती माहिती 

- अशी माहिती आहे की ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याने आगीत अडकल्यानंतर वडिलांना फोन करुन त्याची माहिती दिली होती. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर 40 जणांचे पथक मदतीसाठी धावले. 
- आगीचे रौद्ररुप आणि जखमींची संख्या जास्त असल्याचे कळाल्यानंतर 13 अॅम्ब्यूलन्स मदतीसाठी बोलावण्यात आल्या. 
- जखमींना जिल्हा हॉस्पिटलसोबत मदुराईमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे. 

 

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी मदत पाठवली 
- आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ई.पलानीसामी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे एअरफोर्सच्या मदतीची मागणी केली होती. 
- सीतारमण यांनी ट्विट करुन सांगितले, की त्यांना मुख्यमंत्री पलानीसामी यांनी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि त्यांना बाहेर काढण्याचे एअरफोर्सला निर्देश दिले आहे. 
- जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी लिहिले. 

बातम्या आणखी आहेत...