आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 4 मुलांचा 4 वर्षांच्या मुलीवर गँगरेप, घटनेपूर्वी पाहिली पोर्न Movie

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - येथे 7 ते 12 वर्षांदरम्यान वय अशलेल्या 4 मुलांनी एक 4 वर्षांच्या चिमुरजडीवर गँगरेप केल्याचा प्रकार घडला आहे. महाराजपूर पोलिस ठाण्यात शनिवारी याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या मुलांनी घटनेपूर्वी पोर्न मुव्ही पाहिली होती. 


वडील म्हणाले, न्याय मिळाला नाही तर फाशी घेईल 
- पोलिसांनी सांगितले की, पीडितेचे वडील महाराजपूर परिसरातील एक शेतकरी आहेत. शनिवारी मुलगी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 4 मुलांनी तिला एका रिकाम्या प्लॉटवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. 
- वडिलांनी सांगितले की, मुलगी रात्री उशीरापर्यंत घरी परतली नाही, तेव्हा तिला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती रिकाम्या प्लॉटमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली. तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. 
- मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, आरोपी मुलांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर शांत राहण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. न्याय मिळाला नाही, तर फाशी लावून घेणार असल्याचे ते म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...