आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदसौरनंतर सतनामध्ये 4 वर्षीय चिमुरडीबरोबर राक्षसी कृत्य, जंगलात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतना (भोपाल) - मंदसौरनंतर आता सतना जिल्ह्यात अशाच प्रकारचे राक्षसी कृत्य झाल्याचे समोर आले आहे. परसमनिया गावात रविवारी रात्री 25 वर्षीय तरुणआने 4 वर्षीय चिमुरडीचे अपहरण करत तिच्याबरोबर रेप केला होता. महेन्द्रराज गोंड नावाचा हा आरोपी पीडितेला मरणासन्न अवस्थेत जंगलात सोडून पळून गेला. तो मद्यधुंद अवस्थेत होता. गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जिल्हा रुग्णालयात चिमुरडीवर उपचार सुरू आहेत. ती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. 


वडिलांबरोबर झोपलेल्या चिमुरडीला उचलून नेले 
पोलिसांनी सांगितले की, आरोपी रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास मुलीच्या घरी पोहोचला. त्यावेळी चिमुरडी घराच्या अंगणात वडिलांबरोबर झोपलेली होती. आरोपी तिच्या वडिलांशी काही वेळ बोलला आणि निघून गेला. नंतर रात्री 11:30 च्या सुमारास मुलीचे वडील टॉयलेटसाठी गेले, परतल्यानंतर मुलगी जागेवर नव्हती. शोधून सापडली नाही, तेव्हा त्याने नातेवाईकांना सांगितले. 


जंगलात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली चिमुरडी
लोक सगळीकडे चिमुरडीचा शोध घेत होते. सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास रक्तबंबाळ अवस्थेत गावापासून दीड किलोमीटर अंतरावर झाडांमध्ये पडलेली आढळली. लोक तिला त्याच अवस्थेत पोलिस ठाण्यांत घेऊन केले. गावकऱ्यांनी संशयाच्या आधारे, आरोपी महेन्द्रराजच्या घरी शोध घेतला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केले, तेव्हा त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...