आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षाच्या चिमुकलीचा अश्लील व्हिडिओ बनवत होती शिक्षिका, असा झाला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- शहरातील छत्रीपुरा येथील एका प्ले स्कूलमध्ये शुक्रवारी समोर आलेल्या घटनेने पालकांची झोप उडवली आहे. येथील किड्स स्कूलच्या दोन लेडी टीचरवर पाच वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चिमकलीसोबत घडलेल्या या कृत्याचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा तिने आपल्याला त्रास होत असल्याचा पालकांना सांगितले. पीडित मुलीच्या सांगिण्यावरू आणि पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही शिक्षिकेंना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शाळेत पोहोचलेल्या पालकांनी दोन्ही शिक्षिकेंना मारहाण करत गोधळ घातला होता.

 
पोलिसांनी सांगितले की, मुलीने आरोप केला आहे की, तिच्या शिक्षिका तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात टाकून अश्लील चाळे करत होत्या. याचा व्हिडिओ देखील त्या बनवत होत्या.
- मुलीच्या पालकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मुलगी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्रास होत असल्याचे सांगत होती. याविषयी आम्ही तिची विचारपूस केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. तिने शिक्षिकेच्या वर्तनाबाबत सांगिताच सर्व जण हैराण झाले. तात्काल मुलीला घेऊन ते पोलिस ठाण्यात पोहोचले आणि तक्रार दाखल केली.
- पोलिस मुलगी आणि पालकांना घेऊन शाळेत पोहोचले तेव्हा मुलीने ती खोली दाखवली जेथे शिक्षिका तिच्यासोबत गैरवर्तन करत होती. शाळेत पोहोचलेल्या पालकांनी संतापाच्या भारता तेथील शिक्षकांना मारहाण केली.
- एचआर हेडने सांगितले की, ती 15 दिवसांपासून मुलीला भेटले नाही, ती दुसऱ्या क्लासवर आहे. तिने सांगितले की, ती स्पेशली प्ले ग्रुपच्या एक ते दीड वर्षाच्या मुलांवर लक्ष ठेवते. यांच्या क्लासवर दोन शिक्षिका आहेत. जेव्हा दोघीही नसतात, तेव्हा मी क्लासवर व्हिजिटसाठी जाते. जे काही मुलीने सांगितले, ते अतिशय चुकीचे आहे. असे होऊच शकत नाही.
- पोलिसांनी मुलगी आणि पालकांच्या तक्रारीवरून मल्हारगंज ठाण्यात गुन्हा दाखल करून छत्रीपूरा ठाण्याकडे केस सोपवली आहे. सीएसपी वंदना चौहान यांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये छेडछाड झाली असल्याचे सांगितले आहे. मेडिकल रिपोर्ट आणि चौकशी नंतर कलम लावण्यात येतील. पोलिसांनी शाळेची एचआर हेड आणि एका लेडी टीचरला ताब्यात घेतले आहे.


पुढील स्लाडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...