आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात अणुवीज केंद्र क्षेपणास्त्र हल्ल्यातून वाचवण्यासाठी 50 मीटर व्यासाचे 570 टनांचे डोम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावतभाटा- राजस्थानातील अणुविद्युत योजनेच्या सातव्या युनिटमध्ये देशातील तिसरा व राज्यातील पहिला ५७० टन वजनाचा डोम २५ फेब्रुवारी रोजी बसवण्यात येईल. यानंतर अणुभट्टीची इमारत क्षेपणास्त्राच्या हल्ल्यापासून सुरक्षित होईल. या डोमचा व्यास ५० मीटर आहे. डोम तयार करण्यास सुमारे ३७० टन लोखंड लागले आहे. तर २०० टन वजनाच्या सळया बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. यासाठी १० कोटी रुपये खर्च येईल. डोमचे स्ट्रक्चर उचलण्यासाठी १२०० टन वजन उचलू शकणाऱ्या जर्मनीतील क्रेनचा वापर करण्यात येत आहे.  


७ व्या व ८ व्या युनिटमधून २०२१ पर्यंत उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक युनिटमधून वीजनिर्मितीची  क्षमता ७०० मेगावॅट आहे. २०२१ मध्ये रावतभाटा येथून १४०० मेगावॅट वीजनिर्मिती होईल. सध्या सुरू असलेल्या ५ युनिटमधून १ हजार ८० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. 


काक्रापार वीज केंद्रात डोमची स्थापना  
गुजरातच्या काक्रापार अणुवीज केंद्र योजनेत २ अणुविद्युत योजना तयार होत आहेत. दोन्हीमध्ये ७०० मेगावॅट विजेची क्षमता आहे. दोन्ही युनिटमध्ये डोम बसवण्यात आला.


- 370 टन लोखंडाचा डाेमसाठी वापर  
- 200 टन सळया डोमला स्थापित करण्यास लागतील.  
- 45 मीटर उंच अणुभट्टी इमारतीवर ठेवण्यात येईल.  
- 10 कोटी रुपये डोमसाठी अंदाजे खर्च 
- 3 महिने स्ट्रक्चर तयार करण्यास  

बातम्या आणखी आहेत...