आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या निधनानंतर 60 वर्षांच्या अमरजित यांनी जिंकली 125 सुवर्णपदके, 12 वर्षांत 136 पदके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- खन्ना येथील एका शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या अमरजित कौर या महिन्यात निवृत्त होत आहेत. भविष्यात त्या खेळाकडे संपूर्ण लक्ष देणार आहेत. अमरजित शाळकरी असताना स्पर्धांत सहभागी होत असत. त्यांनी पदके मिळवली. परंतु परिस्थितीने त्यांना खेळ सोडून द्यावा लागला. तरीसुद्धा अमरजित यांनी जिद्द सोडली नाही. आता त्यांचे नाव मास्टर्स अॅथेलेटिक्समध्ये चमकत आहे. रविवारी त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली. अमरजित यांना आतापर्यंत १२५ सुवर्णपदके, ७ रौप्य आणि ४ ब्राँझ पथके मिळाली आहेत. गेल्या १२ वर्षांत त्यांनी १३६ पदकांची कमाई केली. आता त्या नॅशनल मास्टर्स म्पियनशिपसाठी प्रॅक्टिस करत आहेत.  


अमरजित यांच्यासाठी हे यश इतके सहजासहजी मिळालेले नाही. रामगड येथे एका सामान्य कुटुुंबात त्यांचा जन्म झाला.  वयात आल्यानंतर जमालपूर येथे त्यांचे लग्न झाले. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे पतीसमवेत त्यांनी खन्ना येथे स्थलांतर केले. त्यांची मुलगी एक वर्षाची झाली आणि पतीचे निधन झाले. मुलीचा सांभाळ, घर चालवण्यासाठी अनेक घरातून त्यांनी काम केले. कारखान्यात जाऊन मजुरी केली. परंतु हिंमत सोडली नाही. यादरम्यान, खन्ना येथील ए. एस. वरिष्ठ माध्यमिक शाळेत त्यांना तात्पुरती नोकरी मिळाली. एकदा शाळेत मुलींना खेळताना पाहून अमरजित यांनी आपलेही स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्या क्रीडा शिक्षक अर्जुन दास यांच्याकडे गेल्या. खेळावरील त्यांचे प्रेम पाहून अमरजित यांना प्रसिद्ध प्रशिक्षक व निवृत्त पोलिस महासंचालक अजायबसिंह यांच्याकडे पाठवण्यात आले. ही गोष्ट २००५ मधील आहे. अजायब यांच्या नेतृत्वाखाली अमरजित यांनी २००७ मध्ये आसाम येथील नॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पंजाब संघाचे नेतृत्व केले आणि प्रथमच सुवर्णपदक मिळवले. आता अजायबसिंग हयात नाहीत, परंतु अमरजित यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. 

 

असे यश  
अमरजित यांनी आतापर्यंत ६ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत दहा हजार मीटर, पाच हजार मीटर व १५०० मीटर स्पर्धेत १३६ पदके जिंकली आहेत. पंजाब येथील मॅरेथॉन स्पर्धेतही त्यांनी ट्रॉफी जिंकली आहे.

बातम्या आणखी आहेत...