आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामस्कत, बंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ओमानमधील प्राचीन शिवमंदिरात पूजा केली. ते एका मशिदीतही गेले. त्याआधी मोदींनी ओमानचे उपपंतप्रधान सय्यद असद बिन अल-सैद आणि कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. मोदींनी सय्यद असद यांच्याशी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्यावर चर्चा केली. दोन्ही देशांत ऊर्जा, वाणिज्य, गुंतवणूक, पर्यटन यांसह ८ क्षेत्रांत करार झाले. दुसरीकडे, ४ दिवसांच्या यात्रेवर कर्नाटकमध्ये गेलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी २ दर्ग्यांवर चादर अर्पण केली. ते याआधी ३ मंदिरांतही गेले होते. मोदींच्या विदेश धोरणात मंदिर, मशिदीवर फोकस होता, तर राहुल यांच्या राजकारणात मंदिर, दर्ग्यावर फोकस होता.
ओमानचे मोतीश्वर मंदिर; १२५ वर्षे जुन्या शिवालयाचा १९ वर्षांपूर्वी व्यापारी समुदायाने केला जीर्णोद्धार
मस्कतमध्ये मोदींनी मोतीश्वर मंदिरात पूजा केली. हे मंदिर १२५ वर्षे जुने आहे. तेथे शिवलिंग आणि हनुमान यांची मूर्ती आहे. मंदिराच्या जवळ एक विहीरही आहे. वाळवंट असूनही ही विहीर कधीही कोरडी पडत नाही, असे म्हटले जाते. ओमानमधील मंदिरात जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. १९९९ मध्ये गुजरातमधील व्यापारी समुदायाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, सुलतान कबूस शाही मशीद आणि ख्वाजा बंदा नवाज दर्गा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.