आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 8 Thousand Crores Loan Waived In Karnataka;Claims In Rahul Gandhi Public Meeting

कर्नाटकात 8 हजार कोटींची कर्जे माफ; राहुल गांधी यांचा जाहीर सभेत दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव- सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकात जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राज्याचा चौफेर विकास करण्याचे उद्दिष्ट त्यांनी गाठण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.  


येथील एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकारने गेल्या ५ वर्षांत शेतकऱ्यांची आठ हजार कोटींची कर्जे माफ केली आहेत. तसेच २७ हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज वाटप केले असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.  


मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांना आव्हान देताना म्हटले, विकासाच्या मुद्द्यावर ते कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहेत. माझ्या सरकारने गेल्या निवडणुकीत केलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. काँग्रेस सरकारने समाजातील सर्व घटकांचा विकास केला आहे.  श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यास २०० कोटींचा निधी दिला. केंद्र सरकारने मात्र निधी मागूनही दिलेला नव्हता, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...