आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - भोजपुरी अॅक्ट्रेस श्रेया मिश्रा शुटिंग दरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटातून थोडक्यात वाचली आहे. स्फोट एवढा मोठा होता की यूनिटमधील सर्वच घाबरले होते. मात्र श्रेया थोडक्यात या दुर्घटनेतून वाचली आहे. ही घटना बुधवारी घडली असून याचा लाइव्ह व्हिडिओ आता समोर आला आहे.
'पृथ्वी राज'च्या शुटिंगदरम्यान झाला स्फोट
- भोजपुरी फिल्म 'पृथ्वी राज'च्या शुटिंग दरम्यान ही दुर्घटना झाली. मुंबईमधील विरार येथे साई वंदना फार्म येथे ही शुटिंग सुरु होती.
- स्क्रिप्टनुसार सेट तयार करण्यात आला होता. अॅक्सन मास्टरच्या इशाऱ्यानंतर श्रेया अॅक्टर अविनाशसोबत पळत होती. त्यांच्या मागे गुंड लागलेले असतात. ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होते.
- स्क्रिप्टनुसार दोन ब्लास्ट होणार होते, पहिला स्फोट नॉर्मल होता मात्र दुसरा स्फोट हा मोठ्या तीव्रतेचा होता.
- दुसरा स्फोट झाला तेव्हा श्रेया त्याच्या अगदी जवळ होती. स्फोटाच्या ज्वाळा तिला लागणार तेवढ्यात ती तेथून निघालेली असते. थोडक्यात ती त्यातून वाचते.
- अॅक्ट्रेससोबत काही अघटीत घडले का या शंकेने संपूर्ण युनिट भयभीत झाले होते.
- श्रेयाने आतापर्यंत भोजपुरी फिल्म अर्जुन, नसीब, मिशन पाकिस्तानमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.