आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hot Asphalt Poured On Sleeping Street Dog During Road Construction Buries It Alive

ती माणसं असूच शकत नाहीत! झोपलेल्या श्वानाच्या अंगावरच बनवला डांबर रोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - आग्रा येथील रस्त्याचे डांबरीकरण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने असे कृत्य केले की त्यांना माणसंही म्हणता येणार नाही. त्यांनी अमानुषपणाची हद्दच पार केली. रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना त्यांनी झोपलेला कुत्रा सुद्धा पाहिला नाही. त्यांनी चक्क त्या कुत्र्याच्या अंगावर जळते डांबर टाकले. एवढेच नव्हे, तर त्या कुत्र्याला तसेच सोडून त्यावरून रोडरोलर सुद्धा नेला. या पाश्वी घटनेत त्या मुक्या जनावराचा जागीच मृत्यू झाला. अमानुषपणाचा हा खेळ येथेच थांबला नाही. त्यांनी त्या श्वानाच्या मृतदेहाला त्यातून बाहेर काढण्याची सुद्धा परवा केली नाही. 


सार्वजनिक बांधकाम विभागाचे कृत्य
> उत्तर प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कथित विकासकामाचे हे कृत्य आहे. त्यांनी या श्वानाचे किंचाळणे सुद्धा दुर्लक्ष केले आणि तेथून काम पूर्ण करून निघून गेले. स्थानिकांपैकीच एकाला हा प्रकार दिसल्यानंतर लोकांची गर्दी झाली. 
> एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे, रस्त्याचे बांधकाम सुरू असताना मला कुत्र्याच्या किंचाळण्याचे आवाज ऐकायला आले. सकाळी-सकाळी हा आवाज ऐकूण मला राहावले नाही. मी धावत त्या ठिकाणी गेलो तेव्हा लोकांनी आधीच गर्दी केली होती. रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले होते आणि कुत्र्याच्या मागचा भाग आणि पाय त्यामध्ये अर्धवट अडकले होते. 
> अख्ख्या परिसरात त्या जनावराच्या किंचाळ्या घुमत होत्या. अस्वस्थ झालेल्या लोकांनी पीडब्लूडीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम थांबवण्याची विनंती केली. काम थांबवून आधी त्या श्वानाला बाहेर काढा असे आवाहन केले. पण, एकही अधिकाऱ्याने स्थानिकांचे ऐकले नाही. उलट आपले काम तसेच सुरू ठेवले. डांबर टाकल्यानंतर त्यांनी त्यावरून रोडरोलर सुद्धा फिरवला. 


PWD म्हणे दोष कंत्राटदारांचाच...
सकाळी-सकाळीच हे प्रकरण घडल्याने आप-आपल्या कामासाठी जाणारे चाकरमाणी सुद्धा तेथेच थांबले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्या कंत्राटदारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीच होऊ शकले नाही. यानंतर पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांना सारे दोष कंत्राटी कंपनीवर ढकलले आहे. ज्या कंपनीला या विकासकामाचे कंत्राट देण्यात आले होते, त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. 


पुढील स्लाइडवर पाहा, या अमानुष घटनेचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...