आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमंचे पे Disco: नवरदेवाने फारिंगवर नाचवली डान्सर, JDU नेत्याच्या मुलाचे रिसेप्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद - झारखंडमध्ये संयुक्त जनता दल (JDU) नेत्याच्या मुलाचा रिसेप्शन पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात जदयू नेत्याचा मुलगा आपल्याच लग्नाच्या रिसेप्शनमध्ये बंदूकीच्या फायरिंगवर डान्सर नाचवताना दिसून येते. नवरदेवाच्या फायरिंगवर सुरुवातीला कलाकार प्रचंड घाबरली. यानंतर तो डान्सरला बंदूक दाखवतो आणि पुन्हा नाचण्यास सांगतो. या प्रकरणात नवरदेवासह एकूण 4 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

 

अटक व जामीनावर सुटका

- धनबाद जिल्ह्यातील लोयाबाद परिसरात 24 जून रोजी जदयू नेता संदेश चौहाणचा मोठा मुलगा राहुलच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडला. यात चौहाण कुटुंबियांनी स्टेजवर डान्सर बोलावून नाचवल्या.

- स्टेजवर कलाकार डान्स करत होती, त्याचवेळी नवरदेव अचानक आपल्या भाऊ आणि मित्रांसोबत बंदूक घेऊन चढला. त्याने आपल्या खिशातून बंदूक काढून फायरिंग सुरू केली. 
- बंदूकीचा आवाज ऐकूण डान्सर प्रचंड घाबरली. तिने वेळीच डान्स थांबवला. मात्र, नवरदेव राहुलला हे आवडले नाहीत. त्याने बंदूक डान्सरकडे वळवली आणि कुत्सित हास्यासह पुन्हा नाचण्यास सांगितले. घाबरलेली असतानाही तिने डान्स सुरू केला आणि नवरदेव पुन्हा फायरिंग करायला लागला. 
- या घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी रेकॉर्ड केला. 24 जूनचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की पोलिसांपर्यंत पोहोचला. जदयू नेत्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. प्रकरण वाढत असल्याने पोलिसांनी सुद्धा दोन दिवसांपूर्वी नवरदेव आणि त्याच्या भावांना अटक केली. यानंतर ते जामीनावर सुटले आहे. या व्हायरल व्हिडिओचा सविस्तर तपास केला जात आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...