आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांपासून एकाच खोलीत कैद हा माणूस; पत्नीने सोडली साथ, खिडकीतून देतात अन्न-पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरतपूर - राजस्थानच्या भरतपूर येथील 32 वर्षीय रविंद्र यादव गेल्या 4 वर्षांपासून एकाच 12*14 फुटाच्या खोलीत कैद आहे. तापमान 5 अंश सेल्सिअस असो वा 50 अंश सेल्सिअस तो या खोलीतून बाहेर आलाच नाही. त्या नातेवाइकांनी सांगितल्याप्रमाणे, तो मानसिकरित्या कमकुवत आहे. रविंद्रवर अनेकवेळा उपचार केले परंतु, त्याची अवस्था काही बदललेली नाही. 


काय म्हणाले वडील...?
रविंद्रचे वडील रामकिशोर यांनी सांगितले, तो लहानपणी एक हुशार मुलगा होता. घरात तो सर्वांचा लाडका होता. शिक्षणातही ठीक असल्याने त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर त्याने आग्रा येथे एका कंपनीत गार्डची नोकरी केली. 11 मे 2011 रोजी आग्रा येथेच त्याचा विवाह सीमा नावाच्या एका मुलीशी लावण्यात आला. लग्नानंतर सर्व काही सुरळीत होते. परंतु, काही दिवसांनंतर त्याची तब्येत बिघडली. यामुळे कंपनीने त्याला नोकरीवरून काढले. गरात असताना त्याचे आरोग्य अधिक बिघडले. आधी भरतपूर आणि नंतर आग्रा अशा विविध ठिकाणी उपचार केले. परंतु, काहीच परिणाम झाला नाही. यानंतर त्यांना एक मुलगा झाला. रविंद्रचे त्याच्यावर खूप प्रेम होते. आजारपण जास्त वाढल्यास त्याचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. 


मुलाला घेऊन पत्नीने घर सोडले
रविंद्रची पत्नी सीमाने सुरुवातीला त्याची खूप सेवा केली. परंतु, वारंवार तोच त्रास आणि तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने दीड वर्षानंतर ती आपल्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली. आता रविंद्रची 24 तास काळजी घेणारा कुणीच नाही. तेव्हापासूनच रविंद्र खूप एकटा पडला आणि कधीही खोलीच्या बाहेर येत नाही. या खोलीतच त्याला खिडकीतून जेवण आणि पाणी दिले जाते. त्याच खोलीत टॉयलेटची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. 


प्रशासन हैराण
अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम शर्मा यांना या घटनेची माहिती आताच मिळाली आहे. युवकाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी एक टीम पाठवली जाईल. यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. प्रशासनाकडून रविंद्र आणि त्याच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले. त्याच्या आरोग्यात किमान इतकी सुधारणा व्हावी की त्याला स्वतःची काळजी घेता येईल एवढीच त्याच्या वडिलांची इच्छा आहे. 


डॉक्टर म्हणाले...
डॉ. एचएस नवल यांच्या मते, अशा प्रकारचा आजार होण्यास अनेक कारणे आहेत. मानसिक रोगीला समाजाच्या मुख्य प्रवाहाता आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना होणारा त्रास कमी होऊ शकतो. तसेच त्यांच्यात सुधारणा देखील होऊ शकते. योग्य उपचार आणि काउन्सलिंगने त्यांना बरे करणे शक्य आहे. 

बातम्या आणखी आहेत...