आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेतपूर- गुरजातच्या कच्छमध्ये रविवारी कार आणि बसमध्ये झालेल्या अपघातात कारमधी प्रवासी नऊ मित्रांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर आहेत. यातील सहा जण आपल्या आई वडिलांचे एकमेव आपत्य होते. सर्व मित्रांनी प्रवासा दरम्यान सेल्फी देखील घेतली होती. ही त्यांच्या आयुष्यातील शेवटी शेल्फी ठरली. यातील हार्दिक बांभरोलिया नावाच्या तरूणाचे 22 जानेवारीला लग्न होणार होते. सर्व मृतांचे शव त्यांच्या गावी पाठवण्यात आले. गावतून एकसोबतच नऊ जणांवर अत्यसंस्कार करावे लागले, यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
एवढा भयंकर होता अपघात...
मिळालेल्या माहितीनुसार, मकर संक्रातिच्या निमित्ताने मोटा गुंदाणा गावातील काही तरूण फिरण्यासाठी निघाले होते. कच्छच्या लोरिया गावाजवळ एका खाजगी बसला त्यांच्या कारणे धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की, यातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- भुज येथून सर्व शव गावात नेण्यात आले, तेव्हा संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले होते. या शोकामुळे संपूर्ण गाव बंद होते. गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून मृतांना श्रध्दांजली अर्पण केली.
अपघातातील मृतांचे नाव...
हार्दिक रजनीकांत बांभरोलिया, राज सेंजलिया, जयदीप बूटाणी, प्रशांत साकलिया पीयूष खोखर,-गौरव कोटडीया, विजय डोबरिया, मयूर पटेल, मिलन पटेल.
पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधीत फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.