आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतरचे गंभीर परिणाम कळावेत म्हणून रस्त्याच्या कडेला उभे केले अपघातग्रस्त वाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात माेठ्या प्रमाणावर नुकसान झालेले वाहन वाहतूक पाेलिसांनी अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला ठेवले. - Divya Marathi
अपघातात माेठ्या प्रमाणावर नुकसान झालेले वाहन वाहतूक पाेलिसांनी अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला ठेवले.

श्रीगंगानगर (राजस्थान)- सुरक्षित वाहन चालवण्यासाठी राजस्थानमधील श्रीगंगानगर पोलिसांनी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. रस्त्याच्या कडेला प्लॅटफाॅर्म तयार करून अपघातग्रस्त वाहने त्यावर ठेवली आहेत. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अपघातग्रस्त वाहनांची स्थिती पाहता यावी आणि यातून बोध घेऊन सर्वांनी सुरक्षित वाहन चालवावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. रस्त्यावर झालेला अपघात किती भयावह असतो आणि याचे काय परिणाम होऊ शकतात याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवला जात आहे. अपघातग्रस्त वाहनांवर पोलिसांनी विविध घोषवाक्ये लिहिली आहेत. यासंदर्भात बोलताना पोलिस अधीक्षक हरेंद्र महावर म्हणाले की, २०१६ मध्ये १९६ तर २०१७ मध्ये १८५ लोकांना अपघातात प्राण गमवावे लागले. या वर्षी अपघातांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा संकल्प आहे.  

 

याआधीही पोलिसांनी राबवली मोहीम

उत्तर प्रदेश पोलिस- नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चित्रपटातील संवादांचा आधार घेत सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश दिला होता. दबंग चित्रपटावर आधारित टि्वटर संदेश तयार करण्यात आला होता.

 

मुंबई पोलिस- मुंबई पोलिसांनी डिसेंबरमध्ये टि्वटर वर इमोटिकॉनचा वापर करून मद्यपान करून वाहन न चालवण्याचा संदेश दिला होता.

 

जयपूर पोलिस- मागील वर्षी जयपूर पोलिसांनी गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकलेल्या नो-बॉलचा फोटो लावत “लाइन क्रॉस करणे महागात पडू शकते’, असा संदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...