आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामेबहिणीकडून अभिनेता जितेंद्रवर शोषणाचा आरोप; 47 वर्षांपूर्वीचे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला- एकेकाळचा स्टार अभिनेता जितेंद्र  ऊर्फ रवी कपूर यांच्यावर वयाच्या ७५ व्या वर्षात लैंगिक शोषणाचा आरोप लागला आहे. हे प्रकरण आताचे नसून ४७ वर्षांपूर्वीचे आहे. जितेंद्रची मामेबहीण असल्याचे सांगणाऱ्या महिलेने हिमाचल प्रदेशच्या पोलिस महासंचालकांकडे लैंगिक शोषणाची तक्रार पाठवली आहे. महासंचालक सीताराम मरडी यांनी म्हटले, अजून एफआयआर दाखल केलेला नाही. आता सिमल्याच्या पोलिस अधीक्षकांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जितेंद्र यांनी आरोप फेटाळून लावला असून विरोधकांचा हा कट असल्याचे म्हटले आहे.  महिलेने पत्रात म्हटले आहे की, १९७१ मध्ये जितेंद्र २८ वर्षांचे होते आणि ती १८ वर्षांची होती. महिलेच्या वडिलांची परवानगी घेऊन जितेंद्रने तिला सिमल्याला नेले होते. तेथे रात्री उशीरा दारूच्या नशेत लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...