आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते कमल हसन आज करणार नव्या पक्षाची स्थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- तामिळनाडूतील अाघाडीचे अभिनेते कमल हसन हे बुधवारी अापल्या राजकीय पक्षाची स्थापना करणार अाहेत. त्यानिमित्त मदुराईतील अाेखाकडाई मैदानावर संध्याकाळी सहा वाजता माेठा कार्यक्रम हाेणार असून या समारंभाला अाम अादमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहणार अाहेत.  

 

कमल हसन यांनी महिना-दाेन महिन्यांपूर्वीच राजकारणात उतरणार असल्याची घाेषणा केली हाेती. त्यासाठी पक्षाची स्थापना करून राज्याच्या राजकारणात पाऊल ठेवणार असल्याचे जाहीर केले हाेते. त्यानुसार बुधवारी मदुराईतील एका कार्यक्रमात रीतसर पक्षाची स्थापना केली जाणार अाहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण केजरीवाल यांनाही देण्यात अाले अाहे. त्यासाठी कमल हसन व केजरीवाल यांची नुकतीच बैठकही झाली. 


दरम्यान, कमल हसन यांनी राजकारणात उतरणार असल्याचे जाहीर केल्याने केजरीवाल यांनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले हाेते. दरम्यान, हसन यांनी बुधवारी हाेणाऱ्या सभेला एका नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी माेठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अावाहन राज्यातील नागरिकांना टि्वटरवरून केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...