आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घोटाळ्यातील चौथ्या खटल्याचा निकाल स्थगित;लालूंच्‍या वकिलाचा नवा अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याच्या चौथ्या खटल्याचा निकाल सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी लांबणीवर टाकला. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा आरोपी आहेत.   


हा खटला दुमका कोशागारातून ३.१३ कोटी रुपयांची रक्कम काढल्याशी संबंधित आहे. या प्रकरणात महालेखापालांच्या कार्यालयातील तत्कालीन तीन अधिकाऱ्यांना भादंविच्या कलम ३१९ नुसार पक्षकार करावे, अशी मागणी करणारा अर्ज लालूप्रसाद यादव यांच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात दाखल केला होता. त्यात झालेल्या टायपिंगच्या काही चुका दुरुस्त करून त्यांनी गुरुवारी हा अर्ज पुन्हा दाखल केला. न्यायालय आता शुक्रवारी या अर्जावर निर्णय घेणार आहे. या अर्जामुळे विशेष न्यायाधीश शिवपाल सिंग यांनी निकाल लांबणीवर टाकला. निकालाची तारीख निश्चित करण्यात आली नाही. दुमका येथील या घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्याशिवाय २९ आरोपी आहेत.  


लालूप्रसाद  यांना चारा घोटाळ्याच्या तीन प्रकरणांत तर मिश्रा यांना दोन प्रकरणांत शिक्षा झाली आहे. चाइबासा कोशागारातून अवैधरीत्या ३७.७ कोटी रुपयांची रक्कम काढल्याच्या पहिल्या प्रकरणात लालूंना २०१३ मध्ये शिक्षा झाली होती. 


देवगढ कोशागारातून २१ वर्षांपूर्वी ८९.२७ लाख रुपये काढल्या प्रकरणाच्या दुसऱ्या खटल्यात लालूंना ६ जानेवारी २०१८ रोजी साडेतीन वर्षांचा तुरुंगवास, १० लाख रुपये दंड सुनावला आहे. तिसऱ्या प्रकरणात जानेवारीत विशेष न्यायालयाने यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.