आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाला चिमणी धडकली, दाेन खासदारांसह 163 प्रवासी बचावले;दिल्लीला जात होते विमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- रायपूरहून नागपूरमार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी सकाळी एक चिमणी धडकली. मात्र यामुळे सुदैवाने काेणतीही दुर्घटना न घडल्यामुळे ताम्रध्वज साहू व अर्का केसरी या दाेन खासदारांसह १६३ प्रवासी बचावले. ही चिमणी विमानच्या समाेरील भागातील पंख्यात अडकली हाेती, त्यामुळे हे विमान तातडीने नागपुरात उतरवण्यात अाले. तेथील अभियंते दुपारी २ वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामात व्यग्र हाेते, मात्र तरीही चिमणी अडकल्याने  झालेला विमानातील तांत्रिक दाेष दूर हाेऊ शकला नाही. अखेर दिल्लीहून एक रिकामे विमान मागवून दुपारी ४.५० वाजता त्याद्वारे प्रवाशांना पाठवण्यात अाले. दरम्यान, नागपूर विमानतळावर काही काळ अडकलेल्या प्रवाशांना भाेजनाएेवजी केवळ अल्पाेपाहार देण्यात अाल्यामुळे या प्रवाशांनी विमानतळ कर्मचाऱ्यांशी वाद घातला.

बातम्या आणखी आहेत...