आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिराविषयी श्री श्री रविशंकर यांनी नेतृत्व करू नये; आखाडा परिषदेचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना रामजन्मभूमी मंदिर निर्माणाचे नेतृत्व करू नये, असे बजावले आहे. त्यांना हा नैतिक अधिकार नसल्याचे नरेंद्रगिरी म्हणाले.
श्री श्री रविशंकर कोणत्याही आखाड्याशी संबंधित नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्याही आखाड्याचे किंवा मंदिराच्या मुद्द्यावर नेतृत्व करण्याचा अधिकार नाही.

 

रामजन्मभूमी मंदिर निर्माणाचे नेतृत्व करण्यासाठी त्याच्याशी संबंधित साधू-महात्मे आहेत. निर्मोही आखाड्याने त्यांना यासंबंधी नेतृत्वाची परवानगी दिलेली नाही. त्यांनी यापासून दूर राहावे.  


राममंदिर निर्माणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आम्हाला न्यायालयावर विश्वास असल्याचे महंत नरेंद्रगिरी म्हणाले. २०१९ च्या कुंभमेळ्यासंबंधी १३ आखाड्यांची बैठक १६ मार्च रोजी होणार असल्याचे ते म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...