आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - देशातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाची सून आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांचा 15 जानेवारी हा वाढदिवस आहे. डिंपल यांच्याशी लग्न करण्यासाठी अखिलेश यांना खूप मेहनत घ्यावी लागली होती. यानिमित्ताने DivyaMarathi.Com अखिलेश आणि डिंपल यांची लव्ह स्टोरी सांगत आहे.
कॉमन फ्रेंडने घडवली यांची भेट...
- 25 वर्षीय अखिलेश यांची भेट 21 वर्षीय डिंपल यांच्याशी कॉलेजच्या दिवसांत झाली होती.
- डिंपल लखनऊ युनिवर्सिटी (एलयू) तून कॉमर्सचे शिक्षण घेत होत्या, तर अखिलेश ऑस्ट्रेलियातून इंजिनियरिंगमध्ये मास्टर डिग्री घेऊन परतले होते.
- एक कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली.
आर्मी बॅकग्राउंड आहे डिंपलचे
- उत्तराखंडच्या रहिवासी डिंपल यांचे आर्मी बॅकग्राउंड होते. त्यांचे वडील कर्नल होते, तर अखिलेश सशक्त राजकीय कुटुंबातून आहेत.
- दोघांच्या लग्नासाठी कुटुंबीय तयार नव्हते. डिंपल यांच्या फॅमिलीला फक्त मुलीचा आनंद पाहिजे होता, परंतु मुलायम मुलाच्या पसंतीला राजी नव्हते.
- वडिलांची समजूत घालण्यासाठी अखिलेश यांना खूप मेहनत करावी लागली. शेवटी त्यांना मुलाचे ऐकावेच लागले.
- 24 नोव्हेंबर 1999 रोजी अखिलेश आणि डिंपल यांचे लग्न झाले. त्यांना 3 मुले अर्जुन, टीना आणि अदिति यादव आहेत.
'डिंपलचे आयुष्यात येणे ठरले लकी..'
- लव्ह मॅरेज करणारे अखिलेश सीएम बनल्यानंतर एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की, लग्न होताच त्यांचे नशीब बदलले होते.
- डिंपलचे त्यांच्या आयुष्यात येणे खूप लकी ठरले.
दोघांचे छंद आहेत वेगळे
- डिंपल स्वभावाने एकदम शांत आहेत. त्यांचा साधेपणाच त्यांची ओळख आहे.
- दुसरीकडे, अखिलेश यांना स्पोर्ट्समध्ये रुची आहे. त्यांना क्रिकेट आणि फुटबॉल खेळणे खूप आवडते.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, अखिलेश यादव आणि डिंपल यांचे खास फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.