आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिगड विद्यापीठातील स्काॅलर बनला अतिरेकी; हिजबुल मुजाहिदीनमध्ये प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवागी संघटना हिजबुल मुजाहिदीनमध्ये गेलेला हा विद्यार्थी काश्मीरच्या कुपवाडामध्ये राहणारा आहे. (व्हायरल झालेला फोटो) - Divya Marathi
दहशतवागी संघटना हिजबुल मुजाहिदीनमध्ये गेलेला हा विद्यार्थी काश्मीरच्या कुपवाडामध्ये राहणारा आहे. (व्हायरल झालेला फोटो)

अलिगड/श्रीनगर- अलिगड मुस्लिम विद्यापीठातील पीएचडी संशोधक मनान बशीर वानी हा कथित दहशतवादी बनला आहे. एके-४७ एसॉल्ट रायफल आणि हिजबुल मुजाहिदीनमध्ये सामील झाल्याचे छायाचित्र समोर आल्यानंतर विद्यापीठाने त्याला काढून टाकले आहे. वसतिगृहातील त्याची खोली सील केली असून तपासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली.   


२६ वर्षांच्या वानीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विद्यापीठात छापेमारी केली. वसतिगृहात राहणारा मुजम्मील नावाचा दुसरा एक विद्यार्थी चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. वानीला २ जानेवारीला विद्यापीठात पाहिले गेले होते. 


चार दिवसांपूर्वीच घरी जायचे होते, पण त्याआधीच तो दहशतवादी झाल्याची बातमी झळकली. प्रकाशित झालेल्या छायाचित्रानुसार, तो ५ जानेवारीला हिजबुलमध्ये दाखल झाला. त्याच्या कुटुुंबीयांनी रविवारी तक्रार दिली होती. शेवटचे तो दिल्लीत दिसला होता. वानी दहशतवादी झाला असे म्हणणे घाईचे होईल, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे एएमयूचे प्राध्यापक मोहसीन खान म्हणाले.


वानीचे वडील प्राध्यापक, भाऊ अभियंता  
मनान वानी हा कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वडील बशीर अहमद हे प्राध्यापक व भाऊ कनिष्ठ अभियंता आहे. दोघेही सरकारी नोकरीत आहेत. तो पाच वर्षांपासून एएमयूमध्ये शिक्षण घेत आहे. एमफिल केल्यानंतर अॅप्लाइड जिओलॉजीत तो पीएचडी करत आहे. मागील वर्षी काश्मीरमध्ये आलेल्या पुरानंतर वानीने जीआयएस तंत्रज्ञानावर भोपाळमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत सादरीकरण केले. त्याला उत्कृष्ट प्रेझेंटेशनचा पुरस्कारही मिळाला.


बंदुकीबरोबरचा फोटो होतोय व्हायरल 
- अलिगड प्रशासनावेही या प्रकरणाचा अद्याप दुजोरा दिलेला नाही. मनानचा एके 47 रायफलबरोबरचा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. हाती येत असलेल्या माहितीनुसार मनान वानी अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाइड जियॉलॉजीमध्ये पीएचडी करत होता आणि त्याने काही दिवसांपूर्वी विद्यापीठ सोडले होते. 
- असे सांगितले जात आहे की, मुनान बशीर वानी साऊथ काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याचा राहणार आहे. मुनानेने अलिगड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता. 
- मनान वानी 5 जानेवारीला दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला होता, अशी माहिती मिळाली आहे. 


विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे काय?
एएमयूचे प्रॉक्टर प्रो. एम मोहसीन खान म्हणाले की, या विद्यार्थ्याबाबत अद्याप आमच्याकडे काहीही माहिती नाही. तर छात्रसंघाचे नेते सज्जाद सुभान यांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विद्यार्थी दहशतवादी संघटनांशी संलग्न झाल्याची माहिती मिळाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...