आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रा : 27 जूनला पहिला जथ्था रवाना होणार, २ लाखांवर भाविकांची नोंदणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहलगाम/श्रीनगर/जम्मू - अमरनाथ यात्रेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आगामी २७ जूनला पहिला जत्था जम्मूच्या भगवतीनगर बेस कॅम्पपासून रवाना होईल. त्यानंतर २८ जूनला काश्मीरच्या पहेलगाम आणि बालटाल या दोन्ही कॅम्पपासून भक्तांना पाठवले जाईल. पहिल्यांदाच जम्मूच्या बेस कॅम्पमध्ये भक्तांसाठी एसी हॉल बनवण्यात आले आहेत, तर काश्मीर मार्गावर पिण्यासाठी आरओ वॉटरची व्यवस्था केली आहे.

 

अमरनाथच्या दर्शनासाठी आता देशभरात वेगवेगळ्या बँकांच्या ४४० शाखांमधून दोन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी नोंदणी केली आहे. ‘भास्कर’ने येथे पोहोचून या यात्रेची तयारीची, सुरक्षेची आणि सुविधांची पाहणी केली.  


जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले की, काश्मीरच्या अनंतनाग, कुलगाम, श्रीनगर, गांदरबल, पुलवामा या जिल्ह्यांतील महामार्गांवर पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येईल. अनंतनागपासून पांपोरपर्यंतचा महामार्ग सर्वात धोकादायक आहे. तेथे जत्थ्यांवर दहशतवादी ग्रेनेड हल्ला करू शकतात. त्यामुळे महामार्गावर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विशेष तुकड्या तैनात केल्या जातील. अमरनाथच्या सुरक्षेसाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महामार्गांसाठी विशेष काय केले आहे हे सांगू शकत नाही. पण आम्ही सर्व धोकादायक पॉइंटवर नजर ठेवू. मंडळातर्फे ऑनस्पॉट नोंदणीसाठी जम्मूत महाजन हॉल, संगम रसाट, सरस्वती धाममध्ये सोय केली आहे. सध्या जम्मूच्या भगवतीनगरमधील बेस कॅम्प, पहेलगाम आणि बालटालमध्ये तयारीला अंतिम रूप दिले जात आहे. सध्या लंगरचे ट्रक पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. निश्चित केलेल्या ठिकाणी लंगर समित्यांनी काम सुरू केले आहे.

 

जम्मूपासून काश्मीरपर्यंत महामार्गावर अनेक ठिकाणी नाके लावण्यात आले आहेत. येथे वाहनांचे क्रमांक लिहिले जात आहेत. लखनपूरमध्ये सध्या फक्त लंगरच्या ट्रकचे रेकॉर्ड ठेवले जात आहे. येथे भक्तांसाठी पोलिस आणि मंडळातर्फे संयुक्त काउंटर बनवण्यात आले आहे. राज्याच्या सीमेत येताच भाविकांच्या वाहनांच्या क्रमांकाची नोंदणी होईल. सर्वात आधी लखनपूर, त्यानंतर गंज्याल, नंतर उधमपूर, रामबन, श्रीनगरमध्ये वाहनांच्या क्रमांकाची नोंद होईल. या वेली श्राइन बोर्ड आणि केंद्र सरकारतर्फे एकत्रित वेगळीच रूपरेषा तयार करण्यात आली आहे. भक्तांना अमरनाथच्या दर्शनाशिवाय सरकारी बसने जम्मू आणि काश्मीरची प्रसिद्ध मंदिर, देवस्थाने आणि इतर ठिकाणीही नेले जाईल. त्याशिवाय प्रथमच सुरक्षेसाठी महिला सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी यात्रा मार्गावर सैनिकांशिवाय ड्रोनद्वारे नजर ठेवली जाईल. काश्मीरमध्ये महामार्गावरही ड्रोन असतील. लखनपूरमध्ये दाखल होताच भक्तांना जमिनीपासून आकाशापर्यंत सुरक्षा कवच मिळेल. त्यासाठी लष्कराचा घेरा काश्मीरपासून अमरनाथ गुहेपर्यंत राहील.

 

पोलिस, सीआरपीएफ आणि निमलष्करी दल संपूर्ण महामार्गावर तैनात राहतील. लखनपूरमध्ये दाखल होताच नोंदणीकृत वाहनांवर एक स्टीकर लावले जाईल. त्यामुळे वाहनाविषयी सुरक्षा संस्थांना पूर्ण माहिती मिळेल. जर एखाद्या ठिकाणी वाहन अडकले तर त्याला बाहेर काढण्यासाठी कुठल्याही वेळी लखनपूर ते काश्मीरच्या दोन्ही बेस कॅम्पच्या रस्त्यांत पथके तैनात राहतील. त्यांच्याशी पोलिस नियंत्रण कक्षापासून संपर्क राहील.

 

राज्य सरकारने राजीनामा दिल्याने राज्यात राज्यपाल राजवट लागली आहे. त्यानंतर लगेचच अमरनाथ यात्रेसाठी तैनाती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये आता दगडफेक करणारे दिसत नाहीत. गेल्या वर्षीही भाविकांच्या वाहनांवर दगडफेक झाली होती. पण यावेळी नियंत्रणासाठी पोलिसांतर्फे प्रत्येक जिल्ह्यात पूर्ण यादी तयार करून काम केले जात आहे. जे अशा प्रकारच्या घटनांत सहभागी असतात त्यांना पायबंद घालणे हा त्यामागील उद्देश आहे.


 

बातम्या आणखी आहेत...