आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - या बजेट सेशनसोबतच बॉलीवुड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया यांचा राज्यसभा खासदाराचा कार्यकाळ संपणार आहे. सिनेमातील भूमिकांप्रमाणेच जया यांनी ही भूमिका दमदार अंदाजात पार पाडली. नेहमी फिल्मी सिताऱ्यांची खासगी माहिती गुप्त राहते, परंतु राजकारणाने जया यांच्या घरातील छोट्यात छोट्या बाबींवरून पडदा उठवला आहे. DivyaMarathi.Com देशातील सर्वात श्रीमंत महिला राज्यसभा खासदार याच घरगुती बाबींबद्दल सांगत आहे.
अडीच हजारांची बंदूक घेऊन झोपले होते बिगबी
- जया बच्चन यांनी आपल्या संपत्तीच्या डिटेल्समध्ये पती अमिताभ यांचेही असेट्स सादर केले. यात सर्वात चकित करणारी त्यांची 2,500 रुपयांची रिव्हॉल्व्हर होती. सुपरस्टारच्या घरात एवढी स्वस्त रिव्हॉल्व्हर असणे खूप धक्कादायक होते.
- सन 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ल्यादरम्यान बिगबींनी आपल्या ब्लॉग 'बच्चन बोल'मध्येही याचा उल्लेख केला होता.
- त्यांनी 27 नोव्हेंबर 2008 रोजी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते, "गतरात्री जेव्हा दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या माझ्यासमोर आल्या, तेव्हा मी असे काही केले जे पूर्ण जीवनात कधीच केले नव्हते. झोपण्याआधी मी माझी लाइसन्सड .32 रिव्हॉल्व्हर काढली, त्यात गोळ्या लोड केल्या आणि ती माझ्या तकियाच्या खाली ठेवली."
- मुंबई दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री 8 वाजता सुरू झाला आणि 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिला. योगायोगाने ज्या दिवशी अमिताभ यांनी हा ब्लॉग लिहिला, ती त्यांचे वडील हरिवंशराय बच्न यांची बर्थ अॅनिव्हर्सरी होती.
घरी ठेवतात 16 हजारांचा सेफ्टी लॉकर
- जया बच्चन यांच्याद्वारे सबमिट करण्यात आलेल्या सरकारी पेपर्सनुसार, अमिताभ यांच्याकडे त्यांच्यापेक्षा ज्वैलरी आहे. जया यांच्याजवळ 13 कोटींचे दागिने आहेत, तर बिगबी यांच्या नावे 26 कोटींहून अधिक रकमेचे गोल्ड-सिल्व्हर आयटम्स आहेत.
- त्यांच्या घरी बरचशा बहुमूल्य वस्तू आहेत. त्यासोबतच बच्चन कुटुंबीयांनी घरात 16 हजार रुपयांचे सेफ्टी लॉकर ठेवले आहे. याचा तपशीलही जया यांच्या शपथपत्रात आहे.
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या घरी एकीकडे जेथे कोट्यवधींच्या वस्तू आहेत, तिथेच काही चकित करणाऱ्या स्वस्त वस्तूही आहेत. DivyaMarathi.Com त्यांच्या अशाच काही स्वस्त-महाग कलेक्शनबाबत सांगत आहे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.