आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mobile Gameचे अनुकरण 11 वर्षीय मुलाच्या जिवाशी, गळफास लागून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना -शहरातील एका ११  वर्षीय मुलाने माेबाइलवरील गेममधील स्टंटचे अनुकरण करता करता जीव गमावला. परिसरातील लाेेकांनी सांगितले की, हा मुलगा माेबाइल गेमच्या अाहारी गेला हाेता. ताे माेबाइलवर तासन््तास मारामारी, रेसिंग, रेसलिंग यासारखे स्टंटबाजीचे गेम नेहमी खेळायचा, असे कुटुंबीयांनीही मान्य केले. राजवीर ठाकूर असे मृत मुलाचे नाव असून ताे लुधियानातील व्यापारी राेहन ठाकूर यांचा मुलगा हाेता.

 

शवविच्छेदनात या मुलाचा गळफास लागून मृत्यू झाल्याचा नमूद केले अाहे. मात्र, अद्याप पाेलिसांनी गेममुळेच त्याचा बळी गेल्याची पुष्टी दिलेली नाही. राेहन ठाकूर यांचे शहरातील जस्सिया राेडवर अंशिका फॅशन नावाने हाेजअरी नावाचा कारखाना अाहे. त्यांना तीन मुले. राजवीर सहावीत शिकत हाेता. तसेच १४ वर्षीय राेमित व दाेन वर्षीय रुद्र हे त्याचे भाऊ. राजवीरच्या या जीवघेण्या कृतीमुळे ठाकूर कुटुंबीयांना धक्का बसला अाहे.  

 

दाेन भाऊ खाली जाताच राजवीरने गच्चीवर घेतला गळफास 

- पिता राेहन ठाकूर यांनी सांगितले की, ‘मी राेज माेठा मुलगा राेमित व राजवीर यांना शाळेत साेडण्यासाठी जात असे. शुक्रवारी रात्री त्यांची राजवीरशी अखेरची भेट झाली हाेती. शनिवारी शाळेतून अाल्यावर ताे काकाकडे गेला.  रविवारी सकाळी उठून मी पुन्हा नेहमीप्रमाणे कारखान्यात गेलाे. राजवीर सकाळी काकाच्या घरून परत अाला. राजवीर नेहमी एकटा बसून माेबाइल गेम खेळायचा. त्याला खतरनाम गेम खूप अावडायचे.’   

 

 

- राजवीरचा भाऊ राेमितने सांगितले, ‘रविवारी अाम्ही तिघे भाऊ गच्चीवर खेळत हाेताे. काही वेळाने मी व रुद्र खाली अालाे. त्यानंतर काही वेळाने मी जेवणासाठी राजवीरला बाेलावायला गच्चीवर गेलाे तर ताे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून अाला. ते पाहून मी जाेरजाेराने अाेरडलाे, ते एेकून अाईही धावत गच्चीवर अाली.  लाेकही गाेळा झाले. राजवीरला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र  ताेपर्यंत उशिर झाला.

 

थ्री-डी अॅपने बनवायचा फाेटाे

राजवीरचे काका माेहिंदर यांनी सांगितले, राजवीरजवळ स्वत:चा माेबाइल नव्हता. घरात ठेवलेल्या माेबाइलसाेबत ताे नेहमी खेळयचा. थ्री डी अॅपवर फाेटाे बनविण्याचा त्याला नाद हाेता. याच माध्यमातून ताे खतरनाक फाेटाे बनवायचा. अनेकदा सांगूनही माेबाइलवर त्याने गेम खेळणे साेडले नव्हते.  

 

मानसाेपचार तज्ञांचा सल्ला : लहान मुलांवर लक्ष ठेवा 

बहूतांश लहान मुलांना माेबाइल गेमचे अाकर्षण असते. मात्र त्यांना सर्वांसमाेर गेम खेळण्याची परवानगी द्या, एकट्यात नकाेे. जर मुले काॅम्प्युटरवर गेम खेळत असतील तर घरातील इतरांचे लक्ष राहिल अशा जागेवर काॅम्प्युटर असावे. एकांत खाेलीत नकाे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अाई- वडिलांनी मुलांसाेबत राेज काही वेळ तरी घालवावा, त्यांच्यासाेबत स्वत: खेळा.  कधी घरात बसून तर कधी मैदानावर जाऊन खेळा. 

- डाॅ. पुनीत कथुरिया, मानसाेपचार तज्ज्ञ, लुधियाना.

बातम्या आणखी आहेत...