आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत अंबानीच्या आयुष्यातील ती घटना, ज्यानंतर त्याने वजन कमी करण्याची केली जिद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी खूप फिट दिसतो. परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांचे वजन दीडशे किलोहूनही जास्त झाले होते. तेव्हा अनंत यांच्या आयुष्यात असे काही घडले की, त्यांनी आपले वजन कमी करण्याचा निश्चय केला. त्यांच्या आई नीता अंबानी यांनी एका कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख करत सांगितले की, अनंतने का वजन कमी करण्याचा संकल्प केला होता.

 

'मी आणि माझा मुलगा होतो जाडेपणाची शिकार' 
एक कार्यक्रमात नीता अंबानींनी सांगितले की, 'क्रॉनिक अस्थमामुळे अनंतला हाय डोस औषधी घ्यावी लागायची. ज्यामुळे त्याला स्थूलतेचा आजार जडला. यामुळे अनंतला लोक खूप चिडवायचे. यामुळे तो नेहमी परेशान राहत होता. सोशल मीडियावरही त्याच्यावर विनोद केले जायचे.'

 

'जेव्हा सोशल मीडियावर ट्रोल झाला अनंत'
नीता अंबानींनी सांगितले की, 'ही 2013ची गोष्ट अहो. आयपीएलची मॅच सुरू होती. त्यांनी मुलगा अनंतला म्हटले की, मुंबई इंडियन्सची टीम आयपीएलमध्ये जिंकेल तेव्हा तू ट्रॉफी घेण्यासाठी जायचं आहेस. अनंतने असेच केले. तो ट्रॉफी घ्यायला गेला. परंतु ट्रॉफी घेतानाचा अनंतचा फोटो सोशल मीडियावर ट्रोल झाला. लोकांनी त्याची मजा घेतली.'

 

मग अनंतने काय केले?
नीता अंबानी यांनी सांगितले की, 'जाडेपणामुळे ट्रोल झाल्यानंतर अनंत खूप त्रस्त झाला. परंतु निराश बिलकूल झाला नाही. त्या वेळी अनंतचे वय फक्त 18 वर्षे होते. त्याने निश्चय केला की, वजन कमी करायचेच आहे. आणि यासाठी त्याने एक्सरसाइज सुरू केली.'

 

अनंतने कसे कमी केले 118 किलो वजन?
अनंतच्या फॅट ते फिट होण्याचा किस्सा सांगत नीता अंबानींनी सांगितले की, अनंत दररोज 23 किमीपर्यंत पायी चालत होता. डाएट चार्ट फॉलो केला. 5 ते 6 घंटे जिमममध्येच घालवायचा. याशिवाय योगा, फंक्शनल ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, कार्डियो वर्कआउट यामुळे त्याचे वजन कमी झाले. अनंतने सलग 18 महिन्यांपर्यंत मेहनत घेऊन 118 किलो वजन कमी केले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, फॅट टू फिट झालेल्या अनंत अंबानीचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...