आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ancient: शेतात सापडली 2 हजार वर्षे प्राचीन कलाकृती, कुणी म्हणते कार्तिकेय तर कुणी पंचमुखी शिवलिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवानपूर (बिहार) - येथील ओरगाव परिसरात मंगळवारी काम सुरू असताना शेतकऱ्याला एक प्राचीन मूर्ती सापडील आहे. कमलेश तिवारी कुदाळने माती पोखरत होते. त्याचवेळी त्याच्या कुदाळला वजनदार धातू लागल्याचा आवाज आला. त्यांनी हाताने जमीन पोखरण्यास सुरुवात केली. तेव्हा एक प्राचीन मूर्ती त्यांच्यासमोर आली. गावकऱ्यांना हे वृत्त कळताच मूर्ती पाहणाऱ्यांची गर्दी झाली. यानंतर त्याची साफ-सफाई करण्यात आली. तेव्हा लोकांनी ही मूर्ती भगवान कार्तिकेय, भगवान शिव आणि काहींनी शिवलिंग असल्याची चर्चा सुरू केली. सोबतच या प्रतिमेवरून परिसरात आणि आसपासच्या गावांत विविध प्रकारच्या अफवा उठल्या आहेत. 


जानकारांच्या मते, हे पंचमुखी शिवलिंग...
- उप-जिल्हाधिकारी कुमारी अनुपमा सिंह यांनी भास्करशी संवाद साधला. त्यामध्ये बोलताना त्या म्हणाल्या, ही मूर्ती सापडल्याची अधिकृत माहिती मिळाली नव्हती. अशा प्रकारची प्राचीन मूर्ती सापडली असल्यास ती पोलिसांकडे सुपूर्द केली जाईल आणि पुरातत्व वैज्ञानिकांकडून ती संरक्षित केली जाईल. 
- लाल दगडांना आकार देऊन कोरण्यात आलेली ही मूर्ती पंचमुखी शिवलिंगचा वरचा भाग आहे. मथुरा येथील पुट:काशी प्रसाद शोध संस्थानचे पुरातत्ववेदता डॉ श्याम सुंदर तिवारी यांनी ही माहिती दिली. ही मूर्ती आरंभिक काळाची आहे. तसेच ती मथुरेची आहे. याची निर्मिती पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात झाली आहे. 
- गुप्त काळात वाराणसी आणि सारनाथ येथे लाल दगडाच्या कलाकृती बनवल्याचे पुरावे आहेत. तेथे मा मुंडेश्वरीपेक्षा जुन्या प्रतिमा आहेत. बिहारमध्ये सापडलेली मूर्ती 2 हजार वर्षे प्राचीन आहे. मूर्तीचे डोळे मोठे आणि केस वळणदार आहेत. ही कुषाण काळातील कलाकृती आहे.

बातम्या आणखी आहेत...