आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी आणखी एका तरुणाला SIT केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू -  पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) एका तरुणाला अटक केली आहे. एसआयटीने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात यासंबंधी सविस्तर माहिती  दिली नाही. यामुळे तपासात अडथळे येण्याची शक्यता असल्याचे यात लिहिले आहे. अटक केलेला आरोपी कर्नाटकाच्या विजयपुरा जिल्ह्यातील सिंदगी गावातील असून परशुराम वागमोरे असे त्याचे नाव आहे. त्याला तृतीय अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  


गौरी लंकेश यांची गेल्यावर्षी ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या राजराजेश्वरीनगर येथील निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. यापूर्वी पोलिसांनी ५ जणांना याप्रकरणी अटक केली होती. प्रो. एम. एम. कलबुर्गी यांची २०१६ मध्ये त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती.  विशेष तपास पथकाने सांगितले की, कलबुर्गी व लंकेश यांची हत्या एकाच जातीच्या बंदुकीने केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...