आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे ही फॅमिली: मुलगा-जावयानेने PAKला चारली धूळ, तर मुलीने पकडला ISIचा एजंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - 15 जानेवारीला आर्मी डे साजरा केला जात आहे. यूपीच्या वाराणसीत एक असे कुटुंब आहे, ज्यात वडील, मुलगा आणि जावयाने इंडियन आर्मीत राहून पाकिस्‍तानला धडा शिकवला आणि मुलीने सर्वात यंग ऑफिसर बनून ISIच्या हस्तकाला अटक केली. DivyaM arathi.com तुम्हाला या परिवाराबाबत सांगत आहे. 

 

वाचा या कुटुंबाची पूर्ण कहाणी...
- रिटायर कर्नल सीडी मिश्रा म्हणाले, ते 1965 ते 2005 पर्यंत गोरखा रेजिमेंटचा भाग होते. ते म्हणाले- ''कारगिल युद्धाच्या वेळी मी, माझा मुलगा सुमीत मिश्रा, जावई आशुतोष यांनी एकत्रच पाकिस्तानचा सामना केला होता.''
- ''नंतर 2002 मध्ये काश्मिरात माझी मुलगी रश्मीही सैन्याच्या इंटेलिजन्समध्ये लेफ्टि‍नेंट बनली. कारगिल युद्धानंतर आम्ही तो परिसर सोडला नाही. यादरम्यान आम्ही काश्मिरात 10 महिने घालवले. परंतु कधीही एकमेकांची भेट किंवा बोलणे झाले नाही.
- ''यादरम्यानही अनेक वेळा सीमेवर पाकिस्तानने फायरिंग केली, त्यांना आम्हीही चोख प्रत्युत्तर दिले.''

 

रश्मीने पकडले होते ISI एजंटला 
- रश्म‍ी म्हणाल्या, ''2002 मध्ये सर्वात तरुण ऑफिसर बनून कोलकाता आयएसजी (इंटर्नल सिक्‍युरिटी ग्रुप) मध्ये गेले. तेथे कव्हर्ड ऑपरेशन (गुप्त) आयएसआय एजंटला पकडणे होते.''
- ''2002 मध्येच मला इंडियन आर्मीमध्ये काश्मीर इंटेलिजन्समध्ये बोलवणे आले. पठाणकोटमध्ये मी महत्त्वपूर्ण मोहीम फत्ते केली. सध्या मी  बीकानेरमध्ये लेफ्टिनंट कर्नलच्या पदावर कार्यरत आहे.''
- ''मी माझे शिक्षण डेहराडूनमधून पूर्ण केले आहे. मी सुरक्षेच्या कारणामुळे आयएसआयची डिटेल सांगू शकत नाही.''

 

मुलगा सुमीतने पाकिस्‍तानी तुकड्यांवर केला होता अटॅक 
- सीडी मिश्रा म्हणाले, ''मुलगा सुमीत 1998 ते 2006 पर्यंत इंडियन आर्मीत राहिला. कारगिलमध्ये कॅप्टन बनून त्याने पाकिस्तानी तुकड्यांवर अटॅक केला.''
- ''शत्रूने अनेक वेळा बेसवर कब्जा केला. हिल्सवर खालून फायरिंग करत वर शत्रूच्या ठिकाण्यापर्यंत गेला. काश्मिरात अनेक दहशतवाद्यांनी त्यांच्या तुकडीवर हल्ला केला. सुमीतचे शिक्षण अलाहाबाद युनिवर्सिटीतून झालेले आहे.''

 

जावई आशुतोष 1998 मध्ये झाले सैन्यात भरती
- ते सांगतात की- ''13 वर्षांच्या वयात मी आरआयएमसी (राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेज दून) मध्ये गेलो. नंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी दूनमधून एनडीए केले.''
- ''सप्टेंबर 1998 मध्ये सेना, 190 मीडियम रेजिमेंट (तोपखाना) जॉइन केले. कॅप्टन असल्याने कारगिल युद्धात त्यांनीही शत्रूवर बोफोर्समधून भरपूर दारूगोळा डागला.''
- ''अचूक इन्फॉर्मेशनसेाबत हिल्सवर गोळा डागण्याचे काम कठीण होते. गोळा घरंगळत परत येऊ शकत होता. किती वजनाचा गोळा डागायचा आहे, हे आपल्या तुकडीसाठी तेच ठरवत होते. सध्या ते कर्नलच्या पदावर बिकानेरमध्ये पोस्‍टेड आहेत.''

 

सुमीतचे वडील कर्नल चंद्रदेव मिश्रा म्हणाले,
- ''मी 1965 ते 2005 पर्यंत भूदलाच्या गोरखा रायफलमध्ये होतो. कारगिल युद्धात कुपवाड़ा, उधमपूर आणि गुरेजगंजमध्ये 10 महिने राहिलो. ते म्हणाले की, आम्ही स्लोगन दिले होते- 'कायर होने से मर जाना अच्छा है। खुखरी से दुश्मनों का सिर कलम करना मकसद रहा है।' पाकिस्‍तानी हिल्‍सवर शत्रूच्या वास्तव्याची माहिती घेऊन कब्जा करणे उद्देश होता.''
- ''अनेक दिवसांपर्यंत आपल्या तुकड़ीसोबत गळवाप्रमाणे दगडाला चिकटून राहिलो होतो. संधी मिळताच फायरिंग करून शत्रूला कंठस्नान घातले जात होते.''
- ''खूप दिवसांपर्यंत मी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टमध्ये होतो. ते मला जिवे मारू इच्छित होते.''
- ''रिटायर झाल्यावर मी 30 हून अधिक मुलांना गरजेनुसार, एज्युकेशन गाइडलाइन तयार केली आहे. आजही मुले त्यांच्याकडून शिकतात आणि बहादुरीचे किस्से ऐकून प्रेरणा घेतात.''

 

का साजरा करतात आर्मी डे?
- आर्मी डे, भारतात दरवर्षी 15 जानेवारीला लेफ्टनेंट जनरल (नंतर फील्ड मार्शल) के. एम. करियप्पा यांच्या भारतीय भूदलाचे मुख्य कमांडरच्या पदभार ग्रहण करण्याच्या स्मृतीनिमित्त साजरे केले जाते.
- त्यांनी 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटिश राजवटीतील भारतीय सैन्याचे शेवटचे इंगज मुख्य कमांडर (कमांडर इन चीफ, भारत) जनरल रॉय बुचर यांच्याकडून हा पदभार ग्रहण केला होता.
- या दिवशी त्या सर्व शूरवीर सेनानींना सलामी दिली जाते ज्यांनी कधी ना कधी आपल्या देश आणि देशवासीयांच्या सुरक्षेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या शूरवीर कुटुंबाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...