आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही मनमोहन सिंगांचा आदर करतो, मोदीच्या विरोधातील विरोधकांना जेटलींनी दिले उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेटली राज्यसभेत म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. आम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि देशासाठी त्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान करतो. - Divya Marathi
जेटली राज्यसभेत म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. आम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि देशासाठी त्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान करतो.

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्याबाबत दिलेल्या वक्तव्याबाबत जेटलींनी बुधवारी स्पष्टीकरण दिले. जेटलींनी राज्यसभेच म्हटले की, पंतप्रधानांनी भाषणात एकही मुद्दा उपस्थित केला नाही. आम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि देशासाठी त्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान करतो. मोदींनी निवडणुकीच्या एका रॅलीमध्ये दावा केला होता की, मणिशंकर अय्यर यांच्या घरी मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत एक गोपनीय बैठक झाली होती. त्यात काही पाकिस्तानींची उपस्थिती होती. मोदींच्या या वक्तव्यावरून संसदेत कायम गदारोळ होत राहिला. विरोधक मोदींच्या माफीवर अडून आहेत. 


जेटली राज्यसभेत काय म्हणाले?
जेटली म्हणाले, पंतप्रधानांनी भाषणात कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही. तसेत त्यांच्या वक्तव्याचा अर्थ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या देशाप्रती प्रामाणिकपणाबद्दल शंका उपस्थित करणाराही नव्हता. जर तसे वाटले असेल तर ते चुकीचे आहे. आम्ही या नेत्यांच्या भारतासाठीच्या प्रामाणिकपणाचा आदर करतो. 


काय म्हणाले विरोधक?
राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, मी या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सभागृह नेत्यांचे आभार. मीही आमच्या वतीने सांगू इच्छितो की, आम्हीही निवडणुकीच्या काळात केलेल्या अशा वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवू इच्छितो ज्यामुळे पंतप्रधानपदाचा अनादर होत असेल. भविष्यात अशे घडावे असे आम्हालाही वाटत नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...