आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावासोबत बोलताना तरूणीचे आपहरण, चालत्या गाडीत दोन तास केला गँगरेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद- येथे भर रस्त्यात एका तरूणीचे आपहरण करून तिच्यासोबत चालत्या गाडीत दोन तास सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नराधमांनी बलात्कारानंतर तरूणीला हायवेवर तडपत सोडून दिले. अपहरणादरम्यान प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना माहिती दिली होती, परंतु, पोलिस तरूणीची इज्जत वाचवण्यात अपयशी ठरले. ज्या  वेळी तरूणीचे अपहरण झाले तेव्हा ती भावासोबत फोनवर बोलत होती. आरोपींनी तरूणीला रस्त्यावरून उचलून स्कार्पीओ गाडीत टाकले आणि चालत्या गाडीत तिच्यावर दोन तास बालात्कार केला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या तरूणीचे नॅशनल हायवेववरून अपहरण करण्यात आले. 
- यावेळी प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांनी कॉल करून अपहरणाची माहिती दिली. नराधमांनी चालत्या गाडीत तरूणीवर दोन तास बालात्कार केल्यानंतर, तरूणीला हायवेरच सोडून फरार झाले.
- तरूणीचे अपहरण झाले तेव्हा ती आत्याच्या मुलासोबत फोनवर बोलत होती. फोनवरून अपहरणाचा संशय आल्यानतर आत्याच्या मुलाने देखील पोलिसांना याची माहिती दिली.
- पोलिस आरोपीं आणि तरूणीच्या लोकेशनची माहिती मिळवत होते, तेव्हाच आत्याच्या मुलाने फोन करून सांगितले की, आरोपी तरूणीला सीकरी परिसरात नॅशनल हायवेवर सोडून फरार झाल्याची माहिती दिली.
- पीडितेला सीकरी येथून ताब्यात घेतल्यानतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. पीडितेची मेडिकल टेस्ट केल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिस सर्व आरोपींचा शोध घेत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...