आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहे छायाचित्र हिमाचल प्रदेशच्या स्पिती खोऱ्यातील काजा शहरातील १००० वर्षे जुन्या बौद्ध मठाचे आहे. हिवाळ्यात येथे तापमान उणे २० अंशांपर्यंत पोहोचते. जवळपासच्या गावांतील बहुतांश कुटुंबे आपल्या पहिल्या मुलाला लामा बनवतात. म्हणजे तो कधी गृहस्थाश्रमात येत नाही. पूर्ण जीवन गौतम बुद्धांच्या आराधनेत व्यतीत करतो. मोठे होऊन ही मुले देश-जगातील बौद्ध मठांत जातील, मुलांना शिकवतील, व्यवस्थापन पाहतील.
- या मुलांची सर्व जबाबदारी मठाची असते. १० वी उत्तीर्ण होईपर्यंत ते येथे राहतात. कितीही थंडी असली तरी मुले शाळेत जातातच.
- सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत शाळा असते. १ तासाच्या सुटीत ते मठात येऊन जेवतात. जेवणानंतर मुले स्वत:च भांडी घासतात.
- रोज सायंकाळी मुलांना चांगला विचार करा, चांगले करा, चांगले व्हा ही शिकवण दिली जाते. ६ ते ७ पर्यंत होमवर्क करतात. विशेष म्हणजे रात्रीचे जेवण मुले स्वत:च बनवतात.
चंदिगडहून लाहौल स्पितीच्या काजा शहरात जाणारा रस्ता एवढा दुर्गम आहे की, ५२० किमीच्या प्रवासासाठी २ दिवसांचा वेळ लागला. या मोसमात तेथे बाहेरची कुठलीही व्यक्ती येत नाही. दिव्य मराठीचे बातमीदार गौरव भाटिया आणि अश्वनी राणांना या बौद्ध मठापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या दिवसात येथे एवढा बर्फ असतो की वाहन सुमारे २ किमी अलीकडेच सोडावे लागले. नंतर पायीच मठापर्यंत गेले. पण या कठीण परिस्थितीत बर्फाच्छादित पहाडांत त्यांनी भावी पिढी तयार होत असल्याचे पाहिले. त्यानंतर हे छायाचित्र काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.