आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 किलोच्या व्यक्तीवर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया; महिन्यात घटले 50 किलो वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर-  इंदूरच्या मोहक बेरियाट्रिक अँड रोबोटिक्स सेंटरमध्ये ४०० किलोग्रॅम वजनाच्या व्यक्तीवर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मॉरिशस येथील रहिवासी धर्मवीर सिंह मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्या वजनामुळे जेट एअरवेजने त्यांना विमानात नेण्यास नकार दिला होता. रस्ते मार्गाने १५ तासांच्या प्रवासानंतर ते इंदूरला पोहोचले. 


त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र टेबल तयार करण्यात आला होता. अतिरिक्त साहित्य लावण्यात आले. त्यांच्या बेरियाट्रिक शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या उपकरणांची आवश्यकता होती. या शस्त्रक्रियेदरम्यान अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असल्याचे डॉ. माेहित भंडारी यांनी सांगितले.  


शस्त्रक्रियेदरम्यान चार उपकरणे तुटली, आतड्यांना जोडण्यासाठी जास्त लांब स्टेपल लावण्यात आले, रक्तस्राव थांबवण्याचे सर्वात मोठे आव्हान होते. चार जानेवारी रोजी अनेक तासांच्या परिश्रमानंतर ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली. सुमारे १५ दिवस धर्मवीर यांना निगराणीखाली ठेवण्यात आले होते. 


विशेष म्हणजे धर्मवीर हे  स्वत:च्या पायावर उभे राहून शरीराचे ओझे उचलण्यासाठी सक्षम असल्याचा फायदा मिळाला. त्यांच्या प्रकृतीत तेजीने सुधारणा झाली असून त्यांच्या वजनातही घट होत आहे. हॉस्पिटलमध्ये १५ दिवसांत धर्मवीर यांच्या वजनात २९ किलोची घट झाली होती. आता त्यांचे वजन ५० किलोने कमी झाले आहे. अाधीच्या तुलनेत ते सहज चालू शकतात. यादरम्यान त्यांना दमदेखील कमी लागत आहे. पुढील काही महिन्यांत त्यांचे वजन अर्ध्यापेक्षाही कमी होईल, असे डॉ. भंडारी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...