आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी कुहूचा विरोध डावलून भय्यूजी महाराजांनी केला होता डॉ.आयुषीसोबत विवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - डॉ. आयुषीशी बाबांच्या दुसऱ्या लग्नाची मला माहिती देण्यात आली नव्हती, असे कुहूने पोलिसांना सांगितले . महाराजांनी आत्याच्या सांगण्यावरून  असा प्रस्ताव आल्याचे मला सांगितले होते. मी त्यांच्या दुसऱ्या लग्नास विरोध केला होता. माझी प्रत्येक गोष्ट ते एेकत असत. पण ही गोष्ट त्यांनी ऐकली नव्हती. माध्यमातूनच त्यांच्या लग्नाबद्दल समजले. मी खूप नाराज होते. कारण माधवी माझी आई आहे.

 

बाबांच्या दुसऱ्या लग्नानंतर घरातील वातावरण बिघडले, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत महाराजांच्या पत्नी, मुलगी, सेवेकरी, नोकर, जुने विश्वस्त व नातेवाइकांसह १६ जणांची चौकशी केली आहे. सर्वांनी त्यांच्या तणावाचे मूळ कारण सांगितलेले नाही. मात्र, कौटुुंबिक भांडण व आश्रमातील आर्थिक व्यवहार हेच तणावाचे मूळ कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे
 

धराला कुहू इतकाच मान मिळावा, आयुषीची इच्छा

डॉ. आयुषीची चार महिन्याची मुलगी धरा हिलाही कुहूप्रमाणेच मान मिळावा, असे तिला वाटत होते. पण महाराजांचे लक्ष कुहूकडे जास्त असल्याने त्या त्यांच्यावर चिडत असत. कुहूला लंडनला पाठवण्यावरुन महाराजांचे सुरु असलेले प्रयत्न पाहून आयुषीचा संताप होत होता.

 

सासू-सासऱ्याच्या घराचे कर्ज  
महाराजांनी सासू-सासऱ्यासाठी जे घर घेतले होतेे, त्याचे कर्ज देणे आहे. सद््गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे अध्यक्ष शरद आर. पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक विश्वस्त या ट्रस्टपासून दूर झाले होते. ३१ मार्च १९९० रोजी ट्रस्टची स्थापना झाली. १९९६ पासून ट्रस्टला परदेशातून निधी मिळत होता. भय्यू महाराजांचे सर्वात जुने सेवेकरी संजय यादव यांचे सर्व विश्वस्तांशी चांगले संबंध नव्हते. 

 

विजयवर्गीय यांनी काढली समजूत  
शुक्रवारी भय्यू महाराजांच्या निवासस्थानी गेलेले भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी सेवेकरी विनायक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कुहू व आयुषी यांना सांगितले, तुमच्यातील मतभेदांमुळे महाराज, आश्रम व ट्रस्टची प्रतिमा मलिन होतेे आहे. ही वेळ एकसंघ राहण्याची आहे. आता कुटुंबातील लोक आश्रम व ट्रस्टचे संचालन करण्यासाठी नव्याने रणनीती आखत आहेत.

 

रात्री अडीच वाजता मनमीतला गाडीसाठी केला होता फोन
काॅल डिटेल्सवरून कंत्राटदार मनमीत अरोरा यांचे नाव समोर आले आहे. ते गेल्या ११ वर्षांपासून महाराजांचे सेवेकरी होते. महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनीच आपल्या नावाचे सिमकार्ड आयुषीला दिले होते. महाराजांसाठी मनमीत गाडी व चालक उपलब्ध करून देत असत. १२ जून रोजी त्यांनी आत्महत्या केली. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ११ जून रोजी रात्री अडीच वाजता अकोल्याला जायचे अाहे, असे सांगून त्यांनी मनमीतला फोन केला होता.

 

मुलीने परदेशात जाऊन काही बनावे, अशी होती भय्यू महाराजांची इच्छा

भय्यू महाराजांना त्यांची मुलगी कुहू हिच्या भवितव्याची चिंता सतावत होती. या वातावरणापासून दूर नेऊन ठेवण्याचा त्यांचा विचार होता.देशातील नोकरीकडे नेणाऱ्या शिक्षणव्यवस्थेमुळे त्यांना काळजी वाटायची. कुहूने सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगावे, तिने लोकांत मिसळावे, त्यांना समजून घ्यावे, असे त्यांना वाटायचे. भय्यू महाराजांचे जवळचे मित्र देवराजसिंह बडगारा यांनी दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना ही माहिती दिली.  


देवराजसिंह म्हणाले, सिल्व्हर स्प्रिंगमध्ये त्यांच्या निवासस्थानी महाराजांची अनेकदा भेट होत असे. या वेळी झालेल्या चर्चेत भय्यूजी महाराज सांगत, हुकूम, मी तिला या वातावरणापासून दूर ठेवू इच्छितो. तिने सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगावे, लाेकांना भेटावे, त्यांना समजून घ्यावे, असे मला वाटते. कुहू नुकतीच १२ वीची परीक्षा पास झाली होती. ती डेली कॉलेजात शिकते. वडिलांप्रमाणे शांत व चेहऱ्यावर कायम हास्य विलसत असते. ग्रीनिच विद्यापीठात तिचा प्रवेश नक्की झाल्यानंतर मला कॉल करून बोलावले.

 

या विद्यापीठाचे ३ सेंटर आहेत. यातील चांगले कोणते ते सांगा. कुहूला तेथे नेण्याची जबाबदारी तुमची आहे. कुहूला लंडनला पाठवण्याचा आमचा दोघांचा निर्णय होता. तेथील लोक इंग्रजीत संभाषण करतात आणि अमेरिकेपेक्षा अंतर जवळचेही होते. तिला भेटण्यासाठी ८ तासांत जाता येईल, त्यामुळे महाराजांनी लंडनची निवड केली. बॅचलर्स ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनसाठी कुहूने अर्ज केला आहे. २३ सप्टेंबरपासून तिचे सत्र सुरू होणार आहे. कुहूच्या भवितव्याची काही स्वप्ने महाराजांनी उराशी बाळगली होती. ती स्वयंपूर्ण व्हावी असे त्यांना वाटायचे. येथील शिक्षणव्यवस्था फक्त नोकऱ्यांचीच संधी देते. त्यामुळे कुहूने याहीपेक्षा चांगले काही व्हावे, अशी महाराजांची इच्छा होती. 

 

बातम्या आणखी आहेत...