आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात कुमारस्वामींनी सिद्ध केले बहुमत, भाजपचा सभात्याग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शुक्रवारी भाजप आमदारांच्या सभात्यागादरम्यान विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आवाजी मतदानाने विश्वासमत मंजूर झाले. कुमारस्वामी सरकारकडे जेडीएस -काँग्रेस आघाडीचे ११७ आमदार आहेत. सभागृहात बहुमत सिद्ध करण्याआधी काँग्रेस आमदार के.आर. रमेशकुमार यांना एकमताने विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. भाजप आमदार एस.   सुरेशकुमार यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले होते.

 

मात्र, त्यांनी आपले नाव मागे घेतले. सभागृहात विरोधी पक्षनेते बी.एस. येड्डीयुरप्पा म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या पदाची पत राखण्यासाठी एस.सुरेशकुमार यांनी अर्ज मागे घेतला.


विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, आमचे सरकार सर्व घटकांना सोबत घेऊन चालेल. विरोधी पक्षांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील. आमचे सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, विरोधी पक्षनेते बी.एस. येड्डीयुरप्पा म्हणाले, ही सत्तारुढ आघाडी अपवित्र आहे.

 

या सरकारने २४ तासांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही केले तर आम्ही धरणे आंदोलन करू. पुढे ते म्हणाले, सरकार स्थापनेच्या २४ तासांत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे तुम्ही आश्वासन दिले होते. 

 

आम्ही जनतेसाठी कामे करू
लोकांची माझ्यावर विश्वास टाकलेला नाही, याची मला खंत वाटते. आम्ही पाच वर्षांसाठी स्थायी सरकार देऊत. आम्ही जनतेसाठी कामे करू. आम्ही येथे आमचे वैयक्तिक हित साधण्यासाठी आलेलो नाही.
- एचडी कुमारस्वामी, मुख्यमंत्री, कर्नाटक

 

भ्रष्टाचाराचा बोलबाला असेल
भाजपचा लढा मुख्यत्वाने शेतकरी विरोधी, जनविरोधी आणि कुमारस्वामींच्या भ्रष्ट सरकारविरुद्ध आहे. या सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचाराचा बोलबाला असेल. कुणालाही जनतेच्या प्रश्नांची काळजी नाही.
- बी.एस. येड्डीयुरप्पा,  विराेधी पक्षनेते

 

विरोधी पक्षनेतेपदी येड्डी

भाजप विधिमंडळ नेतेपदी ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येड्डीयुरप्पा यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष के.आर. रमेशकुमार यांनी पीठासीन अधिकाऱ्याच्या रूपात आपली निवड झाल्याच्या काही क्षणांतच विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली. गोविंद कारजोल विरोधी पक्षाचे उपनेते असतील.

बातम्या आणखी आहेत...