आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये भाजपने 13 नगरपालिका गमावल्या; भाजपच्या ताब्यात 47 तर काँग्रेसकडे 16

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातमध्ये ७४ नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भाजपने ४७ ताब्यात घेतल्या आहेत. तर काँग्रेसने १६ नगरपालिकांवर विजय मिळवला. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत भाजपने १३ नगरपालिका गमावल्या तर काँग्रेसकडे ५ पालिका नव्याने ताब्यात आल्या आहेत. यापूर्वी त्यांच्या ताब्यात ११ नगरपालिका होत्या. गेल्या निवडणुकांत ७५ पैकी ६० नगरपालिका भाजपच्या ताब्यात होत्या. या निवडणुकांत भाजपकडून १९३४ तर काँग्रेसने १७८३ उमेदवार मैदानात उतरवले होते. १७९३ अपक्ष उमेेदवार   रिंगणात होते. एनसीपीला एक बहुजन समाजवादी पक्षाला एक व  ९ जागांवर अन्य उमेदवार विजयी झाले.  नरेंद्र मोदी यांच्या गृह जिल्ह्यात भाजपने २८ पैकी २७ वॉर्डांत यश आले. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या राजकोट मतदारसंघात भाजपला विजय मिळाला.


भाजपने वास्तव स्वीकारावे : काँग्रेस
काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दाेशी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत १०० चाही अाकडा न गाठणाऱ्या भाजपला अाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पराभव पत्करावा लागला. २०१३ मध्ये ७४ पैकी ५८ नगरपालिका भाजपकडे हाेत्या, ही संख्या अाता ४७ वर अाली अाहे. भाजपने हे वास्तव स्वीकारायला हवे.  


६१% जागांवर यश : भाजप 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी म्हणाले, ‘४७ नगरपालिकांत भाजपचा विजय म्हणजे जनतेने पुन्हा अाम्हाला काैल दिला अाहे. तसेच विकासाच्या धाेरणांना पाठिंबा दिला अाहे. भाजपला २०१३ मध्येही ४७ जागांवर बहुमत हाेते. म्हणजे अामचे काहीच नुकसान झालेले नाही. उलट एकूण जागांपैकी ६१ % जागांवर भाजपला यश मिळाले अाहे. अाम्ही काँग्रेसच्या ४१ विधानसभा मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघांत अाघाडी मिळवलीय.’

बातम्या आणखी आहेत...