आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यात केली पतीची हत्या, जिव वाचवून पळणाऱ्या पत्नीला पाठलाग करून केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवाडी (अलवर)- येथे गुरूवारी सकाळी एका दांम्पत्याचे मृतदेह आढळूल आहे आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही मृतदेह थोड्या अंतरावर सापडले आहेत. घटनास्थळाचा पाहणी केल्यानंतर वाटते की, महिला जिव वाचवण्यासाठी पळाली असावी आणि हल्लेखोरांनी तिचा पाठलाग करून तिची हत्या केली. धारदार शस्त्राने या हत्या करण्यात आल्या आहेत. प्राथमिक पाहणीवरून चोरीच्या इराद्याने हत्या करण्यात आल्याचे लक्षात येत आहे.


असे आहे प्रकरण...
- फूलबाग क्षेत्रातील लोक मॉर्निंगवॉकसाटी निघाले होते, तेव्हा काली खोली धामजवळ एका खोक्यात पुरूषाचा मृतदेह पडलेला होता. तेथून लोक जात होते  आणि तेथूनच काही अंतरावर एका महिलेचा मृतदेह पडलेला होता.
- काही वेळातच तेथे लोक जमा झाले. लोकांना मृतांची ओळक पटली, त्यानी याची माहिती पोलिसांना दिली. ते मृतदेह व्यावसायिक संजय आणि त्याच्या पत्नीचे होते. संजय काली खोली धामवर अनेक वर्षांपासून प्रसाद विकण्याचे काम करत होता. यात त्याचे कुटुंब देखील त्याला मदत करत होते.


काही अंतरावर सापडले मृतदेह..
संजयचा मृतदेह खोक्यात आढळून आला तर त्याच्या पत्नीचा मृतदेह तेथून थोड्या अंतरावर रस्त्याच्या किनाऱ्यावर आढळून आला. पोलिसांनुसार हल्लेखोरांनी दोघांसोबत मारहणा केली. संजयची तिथेच धारदार शस्त्राने हत्या केली, तर जिव वाचवण्यासाठी पळालेल्या पत्नीला काही अंतारावर पाठलाग करून हत्या करण्यात आली. भीवाडी क्षेत्रात अशा सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मृतदेह मोर्चरीमध्ये ठेवून तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तापासाअंती या हत्या चोरीच्या इराद्याने झाल्या असाव्या असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


फोटो : राकेश गोयल
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...