आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचलमध्ये 13,700 फूट उंचीवर बाेगदा तयार होणार; 4 हजार किमीची भारत-चीन सीमा सुरक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेला खिंडीतून जाणारा मार्ग. - Divya Marathi
सेला खिंडीतून जाणारा मार्ग.

तवांग- चार दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अरुणाचल प्रदेशातील सेला खिंडीच्या मार्गावर बोगदा तयार करण्याची घोषणा केली होती. बोगदा तयार करण्याचे काम सीमा रस्ते संस्थेने (बीआरआे) सुरूदेखील केले आहे. १३,७०० फूट उंचीवरील सेला भागात बोगदा तयार केल्यास अनेक फायदे होतील. पहिला फायदा अरुणाचल प्रदेशातील तवांगला होईल. 


बर्फवृष्टीमुळे तवांगचा नेहमीच उर्वरित भागापासून संपर्क तुटतो. परंतु हा बोगदा तयार झाल्यानंतर मात्र तवांग उर्वरित देशाशी जोडलेला राहील. दुसरा फायदा- बोगदा तयार झाल्यामुळे ४ हजार किमी लांबीची भारत-चीन सीमा सुरक्षेच्या दृष्टीने जास्त बळकट होऊ शकेल. तिसरा फायदा-तवांगपासून चीनचे अंतर १० किमीने कमी होईल. तेजपूरहून तवांग सैन्य मुख्यालयाचे अंतरही तासाभराने कमी होईल. लडाखला सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये संपर्कासह सुरक्षा प्रदान करण्याचे काम रोहतांग बोगदा करतो. जोजिला भागातही १४ किमीचा बोगदा तयार होईल. आता सेलातही बोगद्याचे काम सुरू करू, असे जेटलींनी सांगितले होते.


शिपाई रावत आणि सेलाची कहाणी..
१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान शिपाई रावत येथे तैनात होते. सेला नावाची महिला रावत यांना भोजन देण्याचे काम करत होती. रावत शहीद झाले. सेलाने देखील आत्महत्या केली. शहीद रावत यांना मरणोत्तर महावीर चक्र व  पर्वतीय रस्त्याला सेला नाव देण्यात आले.

 

वर्षातून सहा महिने देशापासून तवांगचा संपर्क तुटतो, पवित्र सेला तलावही गोठून जातो एवढा थंडीचा कडाका...
सेला खिंड अरुणाचलमध्ये तवांग व कामेंग जिल्ह्यांना जोडते. दरड कोसळणे व बर्फवृष्टीमुळे सहा महिने हा मार्ग बंद असतो. थंडीच्या मोसमात तर तापमान उणे १० अंश सेल्सियसवर पोहोचते. त्याच्या उत्तरेला सेला तलाव आहे. तो १०१ तलावांपैकी आहे. त्यास तिबेटचे बौद्धधर्मीय पवित्र मानतात. थंडीत हा तलावही गोठतो. सध्या आसामातील तेजपूर आणि गुवाहाटीपासून या पर्वतीय मार्गापर्यंत रस्ता उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...