आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Irrfan: लहानपणी होता लाजाळू, शाळेत बॅकबेंचर, इंग्रजी येत नसल्याने खाल्ला होता मार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणी इरफान खान (डावीकडे) आपला भाऊ इम्रान, बहीण रुक्साना आणि भाऊ सलमानसोबत. - Divya Marathi
लहानपणी इरफान खान (डावीकडे) आपला भाऊ इम्रान, बहीण रुक्साना आणि भाऊ सलमानसोबत.

जयपुर /मुंबई - अभिनेता इरफान खानला दुर्धर आजार - ब्रेन कॅन्सर असल्याची अफवा पसरत आहे. तथापि, याबाबत कोणतीही खरी माहिती स्पष्ट झालेली नाही. इरफान खानने ट्विट करून त्याला दुर्धर आजार असल्याची माहिती दिली होती. पण नेमका कोणता आजार झालाय याबाबत तो स्वत: 10 दिवसांत स्पष्टीकरण देणार आहे. यानिमित्त उत्तम कलाकार असलेल्या अभिनेता इरफान खानबाबत ही माहिती देत आहे.  

 

शाळेत मागच्या बेंचवर बसायचा इरफान 
गुलाबी शहरात जन्मलेला इरफान खान आपल्या शालेय जीवनात एक सर्वसाधारण विद्यार्थी होता. परंतु त्यांचे गणित पक्के होते. सुरुवातीपासूनच ते बॅक बेंचर राहिले. ही बाब त्यांनी जयपूरला दिलेल्या भेटीदरम्यान शेअर केली होती. सोबतच म्हणाले होते की, क्लासमध्ये मागे बसून ते नेहमी स्वप्ने पाहायचे. स्वत:शी बोलायचे आणि आपल्याच विचारांमध्ये गुंग व्हायचे. शाळेच्या वातावरणात नेहमी भीती वाटायची आणि तिथून पळून जाण्याची तीव्र इच्छा व्हायची.

 

शाळेचे नाव ऐकताच उदास व्हायचे इरफान
जयपूरचे टायर व्यावसायिक जमीनदार खान यांच्या घरी जन्मलेल्या इरफानसाठी त्यांचे कुटुंब नेहमी काळजीत राहायचे. कारण त्यांच्या मुलाचे शिक्षणात मन रमत नव्हते. सकाळी 6.30 वाजता शाळेत जाणे आणि दुपारी 4.00 वाजता परत येणे हे त्यांना कंटाळवाणे काम वाटायचे. जशी काही मोठी शिक्षाच दिली आहे. शाळेचे नाव ऐकताच इरफान उदास व्हायचे.

 

म्हणाले - शाळेत मिळाली होती शिक्षा... 
इरफान यांनी दिलेल्या एका मुलाखतीनुसार, अभ्यासाबद्दल त्यांचे कुटुंब नेहमी गंभीर असायचे. जयपूरमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी ते जवळच्या सरकारी शाळेत जायचे, पण आईला वाटायचे की त्यांनी इंग्लिश मीडियममधून उत्तम शिक्षण घ्यावे. तेव्हा जवळच्याच एका कॉन्ह्वेंट स्कूलमध्ये त्यांचे अॅडमिशन करण्यात आले. त्यापूर्वी कधीही इंग्रजीचा संबंध नव्हता, म्हणून भाषा समजण्यात आणि बोलण्यात खूप अडचण यायची. पहिल्यांदाच येथे त्यांनी सर्वांना इंग्रजीत बोलताना पाहिले. इंग्रजीत न बोलल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा शाळेत शिक्षाही झाली."

 

लहानपणापासून खूप लाजाळू होते इरफान
ते म्हणाले, "एकदा पळून जाण्याचा प्रयत्नही केला, परंतु एवढी भीती वाटली की, त्यांना पळून जाणे एंजॉय करता आले नाही. कधीच विचार केला नाही की आपले भविष्य काय असेल? एकदा स्क्रीनवर आर्टिस्टला पाहिले तेव्हा त्यांना खूप फॅसिनेटिंग वाटले. एका दिवशी मित्रांसोबत ते रवींद्र मंच या नाट्यसंस्थेत गेले. म्हणाले- मला रोल पाहिजे. एक काळ असाही होता जेव्हा एन्जॉय करण्यासाठी आम्ही लपूनछपून युनिव्हर्सिटीच्या मागे एका ढाब्यावर जायचो. मी लहानपणापासून खूप लाजाळू राहिलो आहे, पण बंडखोरी प्रवृत्ती माझ्यात उपजतच आहे."

 

क्रिकेटमध्ये करिअर करण्याची परवानगी नाकारली कुटुंबाने
इरफानने कसेबसे 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले, पण आता त्यांच्या वडिलांना दुसरी चिंता लागली होती. त्यांचा मुलगा शाळा सुटताच बॅट उचलून स्टेडियमला जायला लागला. शेवटी त्यांचे सिलेक्शन सीके नायडू ट्रॉफीसाठी झाले. दुसऱ्या एखाद्या कुटुंबाला यामुळे आनंद झाला असता, पण कुटुंबाने क्रिकेटमध्ये करिअर करण्याची परवानगी दिली नाही. यामुळे इरफान यांचे मन दुखावले. त्यांनी क्रिकेट खेळणे सोडले आणि ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतला. त्यांना 1984 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये अॅडमिशनसाठी स्कॉलरशिप मिळाली. येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, अभिनेता इरफान खानचे लहानपणापासूनचे Rare फोटोज...

बातम्या आणखी आहेत...