आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री नाकारली म्हणून तरूणीवर फेकले अॅसिड; म्हणाला- माझी नाही तर कुणाचीच नाही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅसिड हल्ल्यात जखमी झालेली तरूणी..... - Divya Marathi
अॅसिड हल्ल्यात जखमी झालेली तरूणी.....

पटना- जीपीओ गोलंबरजवळ तरूणीवर अॅसिड फेकल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरूणाला घटनेनंतर 12 तासाच्या आत मंगळवारी सकाळी अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव सोनू आहे. सोनूला पीडित तरूणीवर एकतर्फी प्रेम करत होता, परंतु, तरूणीला तो पसंत नव्हता. तू जर माझी झाली नाही, तर मी तुला कुनाशीच मैत्री करण्याच्या लायकीची सोडणार नाही अशी धमकी देखील सोनूने तरूणीला दिली होती. परंतु, तरूणी त्याचा धमकीला घाबरली नाही, त्यामुळे सोमवारी सायंकाळी सात वाजता सोनूने तिच्यावर हॅसिट अटॅक केला.


जीपीओ गोलंबरजवल तरूणीने फेकले होते अॅसिड...
जीपीओ गोलंबरजवल पटेल नगरच्या बाबा चौकात राहणाऱ्या तरूणीवर बाईकवरून आलेल्या टवाळखोराने सोमवारी अॅसिड फेकले. तरूणी आपल्या मामासोबत आर ब्लॉककडे जात होती. यावेळी टावाळखोराने मागून येऊन तरूणीवर अॅसिड फेकले आणि फरार झाला.


अॅसिडमुळे पीडितेचा गळा, पाठ आणि डोक्याचा काही भाग भाजला. अॅसिडचे शिंतोडे मामाच्या आंगावर देखील उडाले आणि ते देखिल जखमी झाले. गंभीर स्थितीत दोघांना उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले.


तीन महिन्यांपासून देत होता त्रास...
पीडिताने सांगितले की, आरोपी तरूण गेल्या तीन महिन्यांपासून तिला त्रास देत होता. सतत फोन करून तो प्रेम असल्याचे सांगत होता. काही दिवसांपूर्वी आरोपी तरूणाने पीडितेला पटेल नगरमध्ये अडवून माझ्याशी मैत्री केली नाहीस, तर तुझा चेहरा कुणाला दाखवण्याच्या लायकीचा सोडणार नाही अशी धमकी दिली होती. 


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...