आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात रोशन बचावला, अखेर जवान व पोलिसांच्या 35 तासांच्या मेहनतीस यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवास- मध्य प्रदेशातील देवासजवळील उमरिया गावात शनिवारी एका शेतातील ३८ फूट खोल बोअरवेलमध्ये ४ वर्षाचा रोशन खेळता खेळता पडला होता. पोलिस व लष्कराच्या जवानांनी तब्बल ३५ तास प्रसंगावधान राखत अविश्रांत मेहनत घेऊन त्याला जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले. रोशनला खातेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. रविवारी सकाळपासून रोशनला पाइपद्वारे ग्लुकोज व दूध देण्यात आले. यावेळी त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. जेसीबी मशिनद्वारे खोदकाम करून बोगदा तयार करण्यात आला. त्यानंतर लष्कराने शक्कल लढवत एका दोरखंडाने मुलास ओढून बाहेर काढले.


मुलास थंडी वाजून आली म्हणून औषधही दिले : दुपारी तीन वाजता मुलास अचानक थंडी वाजून आली.  तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला नळीद्वारे औषध देण्यात आले. थोडे अन्नही दिले. त्यानंतर काहीवेळाने मुलगा शांत झोपी गेला. याची पिता भीमसिंह  व कर्मचाऱ्यांनी खात्रीही करून घेतली.

 

आई म्हणाली, मुलगा सुखरूप; सर्वजण प्रार्थना करा
मुलाची सुटका करताना आई रेखाने मुलांशी संवाद साधला. त्यानंतर बोलताना तिने सांगितले, मी त्याच्याशी बोलले आहे. तुम्ही सर्वजण तो सुखरूप बाहेर यावा म्हणून प्रार्थना करा. तिने असे सांगताच, सर्वांचेच डोळे पाणावले.

बातम्या आणखी आहेत...