आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari : 11 क्रमांकाचे गूढ कायम.. 11 मृत्यू आणि 11 पाईपबरोबर इतर आहे संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडी येथील 11 जणांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी अद्याप काहीही ठोस सांगितलेले नाही. मात्र तंत्र-मंत्र, काळी जादू किंवा धार्मिक विधीशी संबंध असल्याच्या दिशेने हे प्रकरण जात आहे. त्यात 11 क्रमांकानेही आता या प्रकरणातील गूढ वाढवले आहे. सुरुवातीला 11 मृतहेह आणि नंतर घराबाहेर दिसणारे 11 पाईप याचा संबंध जोडण्यात आला. पण हे एवढ्यावरच थांबत नाही. घरात इतरही काही गोष्टींबरोबर 11 क्रमांकाचा संबंध असल्याचे विविध मीडिया रिपोर्ट्सकमध्ये समोर येत आहे. 


11 मृतदेह 
ही घटना घडल्यानंतर घरामध्ये कुटुंबातील तब्बल 11 जणांचे मृतदेह आढळून आले. सुरुवातीला 11 जणांचे मृतदेह असल्याकडे फार कोणी लक्ष दिले नाही. पण नंतर हळू हळू 11 हा आकडा सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. त्यामुळे 11 जणांचाच आत्महत्येत समावेश का? हेही मोठे गूढ बनले आहे. 


11 पाईप
घराच्या बाहेर असलेल्या 11 पाईपांची सध्या माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे. त्यात या पाईपांमध्ये 4 पाईप सरळ आणि 7 वळालेले होते. तर मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे याचाही संबंध जोडला जातोय. मृतांच्या कुटुंबीयांनी मात्र हे पाईप फक्त व्हेंटिलेशनसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. 


11 खिडक्या 
बुराडीच्या घटनेत 11 क्रमांकाचे गूढ फक्त मृतदेह आणि पाईपांच्या संख्येवर थांबलेले नाही. भाटिया कुटुंबीयांचे जे घर आहे, त्यांच्या घराला असलेल्या खिडक्यांची संख्यादेखिल 11 होती. आता त्यांनी घराला 11 खिडक्या ठरवून केल्या की हाही एक योगायोग होता याबाबत फार काही माहिती नाही. 


11 पायऱ्या 
खिडक्यांची 11 ही संख्या योगायोग असे म्हणायचे झाले तर मग घरात वर जाण्यासाठी ज्या पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत, त्यांची संख्याही 11 असल्याचे सांगितले जात आहे. मग हाही योगायोगच समजायचा की, यात खरंच काही अंधश्रद्धा होती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


11 अँगल
एवढेच नाही तर घराच्या दाराच्या वर एक जाळी लावण्यात आलेली आहे. या जाळीला 11 अँगल असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा एक नव्हे तर अनेक गोष्टींशी 11 क्रमांकाचा संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे खरंच हा काही अंधश्रद्धेचा प्रकार होता का? आणि त्याता 11 क्रमांकाशी संबंध होता का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...