आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टात सरकारविरुद्ध खटले वाढले; नोटबंदी, जीएसटीचा संदर्भ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात सरकारला प्रतिवादी करणाऱ्या प्रकरणांची संख्या गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याचे निर्णय हे त्याचे कारण असल्याचे मत विधी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे आहे. 


विधी मंत्रालयानुसार, सर्वोच्च न्यायालयात २०१७ मध्ये दाखल झालेल्या ४,२२९ प्रकरणांत केंद्र सरकारला प्रतिवादी केले आहे. अशी प्रकरणे २०१६ मध्ये ३,४९७ तर २०१५ मध्ये ३,९०९ होती. या वर्षी २२ फेब्रुवारीपर्यंत सरकारला प्रतिवादी करणाऱ्या ८५९ याचिका दाखल झाल्या आहेत.  सर्वोच्च न्यायालयात सरकारला प्रतिवादी केली जाणारी प्रकरणे वाढत असतानाच सरकारची बाजू मांडणाऱ्या कायदा अधिकाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रंजित सिंह यांच्या राजीनाम्यानंतर सॉलिसीटर जनरल पद रिक्त आहे. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यासह ५ अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडतात.

बातम्या आणखी आहेत...