आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा राम रहीमच्या रहस्यमयी गुफामेध्ये मिळेना CBI ला एंट्री, बाबाचे सहकारी फारर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसा- साध्वी यौन शोषण प्रकरणी 20 वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमच्या रहस्यमयी गुफामध्ये प्रवेश करण्यास सीबीआयच्या टीमला यश आले नाही. कारण बाबाच्या या गुफाची किल्ली मिळालेली नाही. बाबाचे दोन सहकारी विपासना आणि डॉ. पी आर नैन फारार आहेत. मंगळवारी देखील सीबीआयच्या टीमने डेरा सच्चा सौदामध्ये तपास केला. टीम दोन तास डेऱ्यामध्ये होती. सोमवारी देखील सीबीआयची टीम तापास करण्यासाठी डेरा सच्चा सौदामध्ये गेली होती.  

 

400 साधुंना नपुंसक बनवल्या प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरू...
- 400 साधुंना नपुंसक बनवल्या प्रकरणी सीबीआयच्या तपासाला गती मिळाली आहे. या पूर्वी सीबीआयने याप्रकरणी डॉ. महिंद्रसिंहला अटक केली होती
- तसेच सोमवारी या संबंधात तपास करण्यासाठी राम रहीमचा ड्रायव्हर राहिलेल्या खट्टा सिंहला घेऊन सीबीआयची टीम डेऱ्यामध्ये गेली होती. येथे नव्या आणि जुण्या परिसरात सीबीआयच्या टीमने चार तास तपास केला.
- टीम दिल्लीहून जेरा सच्चा सौदामध्ये पोहोचली होती. सध्या टीम सिरसा येथील एका रेस्ट हाऊसमध्ये थांबलेली आहे.


विपासनानंतर पीआर नैनविरोधात जारी होणार वॉरंट?
- पी आर नैन गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. पोलिसांच्या चौकशीला टाळाटाळ करत आहे.
- त्यांचा मोबाईल देखील बंद आहे. अशात पोलिस कधीही पी आर नैन यांच्या विरोधात वॉरंट जारी करू शकतात.
- या पूर्वी विपासना देखील पोलिसांच्या चौकशीला टाळाटाळ करत होते. त्यांच्या विरोधात देखिल पोलिसांनी वॉरंट जारी केले होते.
- अद्याप विपासना आणि आदित्य इंसां फरार आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा डेरा सच्चा सौदामधील फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...