आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर तणाव, निवासी भागात पाकचा गोळीबार; जवान शहीद, दोन नागरिक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानने शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता जम्मूच्या आरएसपुरा, अरनिया, रामगड सेक्टरमध्ये गोळीबार करत मोर्टारचा हल्ला केला. - Divya Marathi
पाकिस्तानने शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता जम्मूच्या आरएसपुरा, अरनिया, रामगड सेक्टरमध्ये गोळीबार करत मोर्टारचा हल्ला केला.

जम्मू- पाकिस्तानी सैनिकांनी सलग दुसऱ्या दिवशी जम्म्ू-काश्मीरलगत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार व हातगोळ्यांनी हल्ला केला. ४५ भारतीय छावण्यांना लक्ष्य करून केलेल्या या हल्ल्यात एक जवान शहीद, तर एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. बीएसएफच्या दोन जवानांसह २३ जण जखमी आहेत. नौशेरा भागात झंगड वसाहतीमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारामुळे एका शाळेत सुमारे १०० मुले अडकली असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, प्रशासनाने दोन हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या भागातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या.

पाकिस्तानच्या गोळीबारात दोन दिवसांत दोन जवानांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. २८ लोक जखमी झाले आहेत.


शुक्रवारी कुठे झाले फायरिंग ?
- पाकिस्तानने शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता जम्मूच्या आरएसपुरा, अरनिया, रामगड सेक्टरमध्ये गोळीबार केला. येथील सुमारे चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. 
- यावेळी मोर्टारचा हल्लाही करण्यात आला. अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. 

भारतीय जवान शहीद
- गुरुवारी सकाळी पाकिस्तानी लष्कराने आरएस पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये इंटरनॅशनल बॉर्डरजवळच्या चौक्या आणि गावांना लक्ष्य करत गोळीबार केला होता. त्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दुसरा एक जवान जखमी झाला. 
- शहीद झालेल्या जवानाची ओळख पटली आहे. हेड कॉन्स्टेबल ए सुरेश असे त्यांचे नाव आहे. सुरेश तमिळनाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातील बांद्रा चेट्टी पट्टी गावाचा रहिवासी आहे.


सीमेवर तणावाचे वातावरण 
- बीएसएफचे महासंचालक के के शर्मा यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये एलओसी आणि इंटरनॅशनल बॉर्डरवर तणावाचे वातावरण आहे. बीएसएफचे जवान पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. 
- गेल्या काही दिवसांत भारताने कारवाईमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान केले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या दोन चौक्या उध्वस्त केल्या. 

बातम्या आणखी आहेत...