आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी तपास संस्थांच्या आडून दबावाचे राजकारण, चंद्राबाबूंची केंद्रावर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयवाडा - केंद्रातील नरेंद्र माेदी सरकार द्वेषबुद्धीने राज्यांना वागणूक देत आहे. त्यामुळे केंद्राने तपास संस्थांच्या आडून दबावाचे राजकारण सुरू केले आहे, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.  


रविवारी सिद्धार्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित तेलुगू देसम पार्टीच्या तीनदिवसीय वार्षिक संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी   ते बोलत होते. नायडू म्हणाले, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा केंद्राने दिला नाही. त्यामुळे केंद्राने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. आगामी निवडणुकीत मतदार त्याचा केंद्राला नक्की धडा शिकवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुपतीमध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवास सामोरे जावे लागेल.

 

आश्वासन न पाळणाऱ्या सरकारसोबत राहायचे नाही, असे ठरवले आहे.  रालोआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारदेखील राजकीय विरोधकांना धमकावण्यासाठी सीबीआय, आयकर तसेच ईडी वापर करते.

बातम्या आणखी आहेत...