आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिरात प्रवेशासाठी १०८ वेळा श्रीराम लिहिण्याची सक्ती, तोगडियांनी अनिच्छेने एकदाच लिहिले 'राम'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- श्रीरामाच्या नावावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. प्रवीण तोगडिया यांनी इंदूरमध्ये श्रीरामाचे नाव लिहिणे टाळले. संचारनगर येथील श्रीरामाच्या निराला धाम मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी १०८ वेळा श्रीरामाचे नाव लिहिण्याची परंपरा आहे. मंदिरात ठिकठिकाणी श्रीराम शब्द लिहिण्यासंबंधी सूचना फलक आहेत. तोगडिया मंदिरात सकाळी दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांनी श्रीराम शब्द न लिहिताच मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे पुजारी प्रकाश वागरेचा यांनी श्रीराम तर लिहावेच लागेल, असे ठासून सांगितले. तेव्हा त्यांनी उभ्या-उभ्या अनिच्छेने एकदाच श्रीराम असे लिहून सोपस्कार आटोपला. पुजाऱ्याकडून श्रीरामचरित मानस ग्रंथ स्वीकारला, पण १०८ वेळा श्रीराम शब्द लिहिलाच नाही. तोगडिया यांच्या अशा वर्तनामुळे पंडित व भाविकांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 


पुजाऱ्यांनी तांेडावर तोगडिया यांना चार शब्द सुनावले. राजकारणी मंडळी श्रीरामाच्या नावाचा वापर राजकारणासाठी करतात. त्यांची श्रीरामावर खरी भक्ती नाही, अशा शब्दांत आपला रोष भाविकांनी व्यक्त केला. भाजप सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी संसदेत कायदा मंजूर न केल्यास ऑक्टोबर महिन्यात लखनऊ ते अयोध्या लाँग मार्च काढणार असल्याचे तोगडिया यांनी उज्जैन येथे बोलताना म्हटले. 

बातम्या आणखी आहेत...