आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाली दलाने राज्यसभेत सोपवली काँग्रेस नेत्याच्या स्टिंगची सीडी; 100 शिखांना मारल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- १९८४ च्या शीखविरोधी दंगलीचे प्रकरण बुधवारी राज्यसभेत उपस्थित करण्यात आले. शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखदेवसिंग ढिंढसा यांनी एका काँग्रेस नेत्याबद्दलची स्टिंगची सीडी सभागृहात सादर केली. त्यात काँग्रेस नेत्याने १०० शिखांची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे.   


ढिंढसा यांनी शून्य प्रहरी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात त्यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांवर आरोप केला. परंतु सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी नावे सभागृहाच्या कामकाजावरून वगळली. काँग्रेस नेत्यासोबत आणखी कोण-कोण होते, याचा तपास करण्याची मागणी ढिंढसा यांनी केली. कारण एक माणूस १०० जणांना मारू शकत नाही. आपल्या विरोधात तपास करण्यात आला. परंतु तो बनावट स्वरूपाचा होता. त्यामुळे माझ्या विरोधात काहीही कारवाई झाली नसल्याचे हा काँग्रेस नेता या सीडीमध्ये सांगत असल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे. हा दावा ऐकल्यानंतर काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा म्हणाले, न्यायप्रविष्ट प्रकरणात संसदेत चर्चा करणे योग्य नाही. सभागृहाला सुनावणी करणाऱ्या न्यायालयात परिवर्तित केले जाऊ शकत नाही. परंतु एखाद्याचे नाव घेणे चुकीचे आहे. दरम्यान, तेलगू देसमच्या खासदारांनी बुधवारी संसदेच्या बाहेर तीव्र आंदोलन केले. अर्थसंकल्पात आंध्रला विशेष पॅकेज देण्यात आले नसल्याने नाराजी आहे. 

 

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती खूप वाईट :  आझाद

जम्मू -काश्मीरमधील परिस्थिती खूप वाईट आहे. अटकेतील  लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रुग्णालयात पलायन करण्यात यशस्वी ठरला. यावरून परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो, असा दावा काँग्रेसने केला. जम्मू-काश्मीरबाबतच्या प्रश्नावर बुधवारी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील परिस्थितीत सुधारणा होत आहे. गेल्या दशकाच्या तुलनेत बरे चालले आहे, असे सरकारचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात तसे दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसचे विवेक ठांका यांनी काश्मिरी पंडितांनी परतावे यासाठी अनुकूल असे वातावरण तयार करण्याची गरज आहे, असे मत मांडले. 

 

खासदारास बाहेर काढले  

आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करत बुधवारीदेखील काँग्रेसचे खासदार के.व्ही.पी. रामचंद्र राव यांचे वेलमध्येे आंदाेलन सुरूच होते. वारंवार सूचना देऊनही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले होते.  नियमांचा भंग केल्यावरून त्यांना बळजबरी सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.  

बातम्या आणखी आहेत...