आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटक विधानसभा: काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, बादामी येथून लढणार सिद्धरमय्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी 6 जागांवर नवीन चेहरे निवडणूक लढवणार आहेत. तसेच विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना बादामी येथून तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी काँग्रेसने पहिल्या यादीत 218 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. भाजपने आतापर्यंत आपले 213 उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच येद्दियुरप्पा भाजपतर्फे या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. ते शिकारीपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, राज्यातील 224 विधानसभा जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. तसेच 15 मे रोजी निकाल लागणार आहेत. 

या 6 जागांवर नवीन उमेदवार

सीट आधीचे उमेदवार नवे उमेदवार
बादामी डॉ. देव राज पाटील सिद्धरमय्या
जगलौर एएल पुष्पा एचपी राजेश
तिप्तुर बी नंजामारी के शदाक्षरी
मल्लेश्वरम एमआर सीताराम के श्रीपद रानू
पद्मनाभ नगर बी गुरप्पा नायडू एम श्रीनिवास
मदिकेरी एचएस चंद्रमौलि केपी चंद्रकला

 

17 एप्रिलपासून सुरू होणार निवडणूक प्रक्रिया

एकूण जागा : 224

बहुमत: 113

मतदारांची संख्या: 4.90 कोटी

वोटर: 4.90 करोड़

महत्वाच्या तारखा....

तारीख शेड्यूल
17 एप्रिल अधिसूचना जारी होणार
24 एप्रिल उमेदवारी दाखल करण्नायाची अंतिम तारीख
25 एप्रिल

उमेदवारांच्या अर्जांची छानणी

 

27 एप्रिला उमेदवारी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख
12 मे मतदान
15 मे निकाल

 

2013 च्या विधानसभा निवडणुकीत येड्डींनी भाजप सोडताच काँग्रेसची सत्ता

पार्टी जागा मतदानाची टक्केवारी
काँग्रेस 122 36.6%
जेडीएस 40 20.2%
भाजप 40 19.9%
इतर 22 23.3%

 

 

बातम्या आणखी आहेत...